Vintage Car

Vintage Car | पुण्यातील शेतकऱ्याने केली कमाल! चक्क भंगारापासून बनवली विंटेज कार

बातम्या

Vintage Car | स्वतःच्या मालकीची गाडी असावी, असे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता महागाई वाढल्याने गाड्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला गाडी घेणे शक्य होत नाही. दरम्यान पुण्यातील एका शेतकऱ्याने आपली चार चाकी गाडीची हौस अतिशय भन्नाट पद्धतीने पूर्ण केली आहे.

Rabbi Crops | अशाप्रकारे मेथीची लागवड करा आणि मिळवा दुप्पट नफा!

पुण्याच्या (Pune) मावळ भागातील रोहिदास नवघणे या शेतकऱ्याने मोठी कमाल करून दाखवली आहे. कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या या दहावी पास शेतकऱ्याने चक्क भंगारापासून कार बनवली आहे. नवघणे यांना स्वतःची गाडी घेण्याची फार इच्छा होती. मात्र गाडीच काय साधी सायकल घेण्याएवढी देखील त्यांची आर्थिक परिस्थिती न्हवती.

Father Son Property Law | वडीलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाहीत हे हक्क; कोर्टाचा हा निर्णय एकदा वाचाच

परंतु, काहीही करून आपण कार बनवायचीच या जिद्दीतून रोहिदास नवघणे यांनी विंटेज कार (Vintage Car) बनवली आहे. यासाठी त्यांनी गावातील भंगाराच्या (Scrap) दुकानातून गाडीचे पार्टस जमवले आणि त्यानंतर कागदावर विंटेज कार रेखाटली. महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या अडिज महिन्यात रोहिदास यांनी कार बनवली. दसऱ्याच्या दिवशी विधिवत पूजा करून रोहिदास यांनी ही गाडी रस्त्यावर उतरवली.

Ahmednagar News । अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा दिड एकर ऊस आगीत खाक! शेतकऱ्याला अश्रू अनावर

ही विंटेज कार बनवण्यासाठी रोहिदास यांना तब्बल अडीच लाखांचा खर्च आला. ही कार बॅटरीवर चालणारी असून त्यामध्ये एकूण पाच बॅटऱ्या लावल्या आहेत. या बॅटऱ्या 5 ते 6 तास चार्ज केल्यानंतर ती 100 किलोमीटरपर्यंत चालू शकते. आजूबाजूचे किंवा रस्त्यावरील लोक फार कौतुकाने ही गाडी पाहत असतात.

Success Story । वा रे पठ्ठ्या! डोंगराळ भागात शेती करून कमावले लाखो रुपये! ‘या’ शेतकऱ्याची कमाल एकदा वाचाच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *