Maharashtra Cabinet Decisions

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगरमध्ये होणार नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय

बातम्या

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार असल्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील उपस्थित होते.

Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येणार

त्याचबरोबर या बैठकीमध्ये काही वेगेवेगळे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय, त्याचबरोबर सुतगिरणी याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Maharashtra Cabinet Decisions)

Havaman Andaj । मोठी बातमी! मध्य महाराष्ट्रासह आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाची माहिती

पाहा मंत्रिमंडळ बैठकीत झालेले महत्वाचे निर्णय

  • अहमदनगर जिल्ह्यामध्ये नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय
  • महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार
  • राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार
  • राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार
  • बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण
  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
  • कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.
  • इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार

Sugarcane crushing season । आनंदाची बातमी! 1 नोव्हेंबरला पेटणार साखर कारखान्याचे धुराडं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *