Success Story । जिद्दीच्या जोरावर कसल्याही परिस्थितीवर मात करत अशक्य गोष्ट शक्य करता येते. हिमाचल मधील एका शेतकऱ्याने विविध अडचणींवर मात करत डोंगराळ भागातील छोट्याश्या शेतजमीनीत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने फक्त हंगामी भाजीपाला ( Vegetables) पिकवून हे उत्पन्न मिळवले आहे.
चंबा जिल्ह्यातील शेतकरी संजीव कुमार यांना शेतीमध्ये छोटे मोठे प्रयोग करायला आवडतात. केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मटर (Muttor) आणि फ़्रांसबीन सारख्या भाजीपाल्याची लागवड करून 3 बिघा जमिनीतून संजीव वार्षिक 5 लाख रुपये कमावतात. याठिकाणी असणाऱ्या हवामानात हंगामी भाजीपाला उत्पादनाला वाव मिळतो. याचा चांगलाच फायदा संजीव कुमार यांना झाला आहे.
Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया
संजीव कुमार यांना ही शेती करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि इतर शेतीची साधने उपलब्ध न्हवती. तसेच डोंगराळ भागात हंगामी नुकसानीची देखील समस्या असते. यावर मात करत संजीव कुमार यांनी आपल्या शेतात मटार, फ्रेंच बीन्स, कोबी, मुळा, वांगी, ब्रोकोली, पालक अशा हंगामी भाज्यांचे उत्पादन घेतले.
या शेतीसाठी संजीव यांनी राज्याच्या कृषी विभागामार्फत ( Agriculture Department) सुरू असलेल्या योजनांचा लाभ घेतला. संजीव कुमार यांनी कृषी विभागाकडून हंगामाबाहेरील भाज्यांचे सुधारित दर्जाचे बियाणे घेतले. याशिवाय कृषी विभागाने त्यांना ५० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच सिंचनाची सोय नसल्याने मृदसंधारण विभागाने पाण्याची टाकी बांधण्यासाठी ३६ हजार रुपयांची तरतूद केली होती आणि अनुदानाची ८० टक्के रक्कमही त्यांना उपलब्ध करून दिली. यामुळे संजीव कुमार चांगल्या प्रकारे आपली शेती करू शकले.