Animal Diet | ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करतात. यासाठी गाई आणि म्हैशी पाळल्या जातात. या जनावरांचे दुधाचे उत्पादन (Milk Production) वाढावे तसेच त्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी शेतकरी विविध उपाय देखील करतात. दरम्यान इंडियन ऍनिमल रिसर्च इन्स्टिट्यूट (IVRI) ने दुभत्या जनावरांसाठी एक विशेष खाद्य तयार केले आहे.
Advantages | या खाद्यपदार्थामुळे होणारे फायदे
1) प्राण्यांची प्रजनन क्षमता वाढेल
2) प्रतिकारशक्ती वाढेल
3) दूध देण्याची क्षमता सुधारेल
या खाद्यपदार्थामध्ये भरपूर पोषण असणारे फायटो-न्यूट्रिएंट्स असतात. हे फायटो-पोषक वनस्पतींमध्ये आढळत असून हे खाद्य केवळ वनस्पतींपासून तयार केले गेले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन असणार नाही. हे खाद्य प्राण्यांना अनेक प्रकारच्या संसर्गापासून वाचवणार आहे.
Pest Control | सावधान! उसातील ‘ही’ कीड वेळीच नियंत्रणात आणा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होणार
या आहारामुळे जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढणार असून त्यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढणार आहे. तसेच जनावरांच्या आजारांवर होणारा खर्चदेखील कमी होईल. महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहील आणि पर्यायाने शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन जास्त बचत होईल.