Voter ID

Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया

बातम्या

Voter ID | कोणत्याही महत्त्वाच्या सरकारी कामात किंवा इतर कामांमध्ये आजकाल ओळखीचा पुरावा आवर्जून मागितला जातो. यामध्ये आधारकार्ड, मतदान ओळखपत्र ( Voter ID) किंवा पॅनकार्ड वापरता येते. यामधील मतदान ओळखपत्र हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच मतदार म्हणून आपले नागरी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी देखील मतदान ओळखपत्र लागते.

Shabari Gharkul Yojana | सामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार! शबरी घरकुल योजनेचा नवीन जीआर निर्गमित; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

अगामी लोकसभा, विधानसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी तुम्हाला मतदान ओळखपत्राची गरज पडणार आहे. एवढंच नाही तर अनेक सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मतदान ओळखपत्र लागते. हे महत्वाचे कागदपत्र अजूनही तुमच्याकडे नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

Havaman Andaj । आज कुठे पाऊस होणार? जाणून घ्या एका क्लिकवर

मतदान ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया (Procedure for Issuance of Voter ID Card)

ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया अतिशय सोप्पी आहे. तुम्ही घरच्याघरी देखील स्वतःचे मतदान ओळखपत्र काढू शकता. ऑनलाइन ओळखपत्र काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्वप्रथम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ‘Voter service portal’ वर क्लिक करावे लागेल. ( Online Voter ID)

ATM Card बदलण्यासाठी बँक आकारणार भारी शुल्क, जाणून घ्या कोणत्या बँका घेत आहेत सर्वात कमी शुल्क, ही आहे यादी

हे पोर्टल ओपन झाल्यानंतर नवे पेज उघडेल यावर तुम्हाला New Registration वर क्लिक करावे लागेल. याठिकाणी एक फॉर्म उघडेल. हा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. यानंतर फॉर्म सबमिट करावा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुमच्या इमेल आयडीवर सरकारकडून एक लिंक पाठवली जाईल.

Pest Control | सावधान! उसातील ‘ही’ कीड वेळीच नियंत्रणात आणा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

या लिंक वरून तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्राचे स्टेटस चेक करू शकता. कमीत कमी 10 ते 12 दिवसांत किंवा जास्तीत जास्त महिन्याभरात तुम्हाला मतदान ओळखपत्र मिळेल. एवढ्या सोप्या प्रक्रियेतून तुम्हाला घरच्याघरी मतदान ओळखपत्र बनवून मिळणार आहे.

Cannabis crop । धक्कादायक! शेतकऱ्याने तुरीच्या शेतात घेतले गांजाचे आंतरपीक! पोलिसांनी छापा टाकत केली मोठी कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *