Shabari Gharkul Yojana | स्वतःच्या हक्काचं घर (Home) हे प्रत्येक सामान्य नागरिकाचं स्वप्न असतं. सामन्य जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘शबरी घरकुल योजना’ सुरू करण्यात आली आहे. 2013 पासून राज्यात ही योजना सुरू असून नुकताच या योजनेचा नवीन जीआर निर्गमित करण्यात आला आहे. ( Shabari Gharkul Yojana)
शबरी घरकुल योजना (Shabari Gharkul Yojana )
राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील घर नसलेल्या लोकांना शबरी घरकुल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ देण्यासाठी निराधार, विधवा आणि दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राथमिकता देण्यात येते. तसेच तुमची वार्षिक उत्पन्न मर्यादा देखील दोन लाखांच्या आतमध्ये असावी लागते. घरकुल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी कमीत कमी 1 लाख 32 हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाखांचे अनुदान देण्यात येते.
Important Documents | शबरी घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- दोन पासपोर्ट साईझ फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
- सात-बारा उतारा किंवा आठ-अ उतारा
- तहसीलदाराकडील उत्पन्नाचा दाखला
- शिधापत्रिका
- आधारकार्ड
- रद्द केलेला धनादेश ( Cancle Check )
Subsidy | शबरी घरकुल योजनेंतर्गत मिळणारे क्षेत्रनिहाय अनुदान
ग्रामीण साधारण क्षेत्र – 1 लाख 32 हजार रुपये
नक्षलग्रस्त किंवा डोंगराळ क्षेत्र – 1 लाख 42 हजार रुपये.
नगरपरिषद क्षेत्र – 1 लाख 50 हजार रुपये
महानगरपालिका क्षेत्र – 2 लाख रुपये