Cannabis crop । गांजाची (Ganja) शेती करणे हे बेकायदेशीर समजले जाते. गांजा हा नशा करण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ असल्याने यावर अनेक निर्बंध आहेत. मात्र गांजाच्या किंमती जास्त असल्याने शेतकरी बेकायदेशीरपणे गांजाची शेती करत असल्याचा घटना सतत समोर येतात. हिंगोली (Hingoli) येथील एका शेतकऱ्याने चक्क तुरीच्या शेतात गांजाचे पीक घेतल्याचे समोर आले आहे.
Havaman Andaj । पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
हिंगोली येथील मुडी गावातील राजू शेषराव पडोळे यांनी तुरीच्या शेतात बेकायदेशीरपणे गांजा पिकवला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. यामध्ये 168 गांजाच्या झाडांसह 91,728 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान गांजाचे बेकायदेशीर आंतरपीक (Intercrop) घेणाऱ्या राजू शेषराव पडोळे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वसमत येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील सहपोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या आदेशाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 3.822 किलोग्रॅम किंमतीचा गांजा सापडला आहे.