Onion rate

Onion Rate | मोठी बातमी! कांद्याचे वाढते भाव रोखण्यासाठी सरकारने केला मास्टरप्लॅन; शेतकऱ्यांना बसणार फटका!

बाजारभाव

Onion Rates | ऐरवी कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याच्या भावाने सध्या देशभरात उसळी घेतली आहे. मागील तीन दिवसांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रतिकिलो 14 रुपयांनी वाढले आहेत. काल (शुक्रवारी) किरकोळ बाजारामध्ये कांद्याचा भाव प्रतिकिलो 55 ते 60 रुपये होता. तर दुसरीकडे घाऊक बाजारात सुद्धा गेल्या चार दिवसांत कांद्याच्या दारात प्रतिकिलो 7 ते 8 रुपयांची वाढ दिसून आली आहे.

Havaman Andaj । पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार (Central Government) सरसावले आहे. पुढील महिन्यापासून बाजारात बफर स्टॉक (Buffer Stock) आणण्यात येणार आहे. यामुळे कांद्याचे दर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक मधील लासलगाव (Lasalgaon) बाजारपेठेत 15 दिवसांपूर्वी घाऊक कांद्याचे दर प्रतिक्विंटल 3,350 रुपये होते. परंतु, बुधवारपासून त्यात वाढ होऊन ते प्रतिक्विंटल 4,800 रुपये झाले आहेत.

Eknath Shinde । शेतकरी बापाने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या, चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना लिहिलं भावनिक पत्र; वाचून येईल डोळ्यात पाणी

कांद्याची भाववाढ रोखण्यासाठी सरकारने याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के अतिरिक्त शुल्क लावले होते. एवढंच नाही तर नाफेडच्या माध्यमातून 2 लाख टन कांदा खरेदी केल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. दरम्यान मागील 15 दिवसांत लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या सरासरी घाऊक भावात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापाठोपाठ राज्यभरातील इतर बाजारपेठांमध्ये सुद्धा उत्तम प्रतीच्या कांद्याची कमाल किंमत 50 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.

Dairy Farming । ‘या’ आहेत गायींच्या टॉप 3 जाती आहेत, गोठ्यात आणाल तर मालामाल व्हाल; जाणून घ्या सविस्तर माहिती

खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी आहे. यामुळे डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहणार आहेत. यामुळे शेतकरी आनंदात असले तरी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यामुळे केंद्र सरकारने ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF)च्या माध्यमातून 2 लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांद्याच्या दरात घसरण होऊन शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

Poultry Farming | सावधान! हिवाळ्यात कोंबड्यांची अशी काळजी घ्याच, अन्यथा निर्माण होईल धोका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *