Poultry Farming

Poultry Farming | सावधान! हिवाळ्यात कोंबड्यांची अशी काळजी घ्याच, अन्यथा निर्माण होईल धोका…

पशुसंवर्धन

Poultry Farming | ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कुक्कुटपालन (Poultry Farming) केले जाते. दरम्यान हवामानात होणाऱ्या बदलांनुसार कोंबड्यांची काळजी घ्यावी लागते. कारण इतर प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्या कमी वेळेत मोठ्या आजारांना बळी पडतात. यामुळे विविध ऋतूंनुसार कोंबड्यांचे व्यवस्थापन ( Birds Management) करावे लागते.

Carrot Farming | गाजराची शेती करताय? तर ही माहिती नक्की वाचा आणि मिळवा भरघोस उत्पादन

विशेषतः हिवाळ्यामध्ये कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती ( Resistance Power) कमी होते. यावेळी त्यांच्यामध्ये अनेक विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य आजार होतात. तसेच आफ्लाटॉक्सिकोसिस सारख्या आजारामध्ये कोंबड्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे खूप नुकसान होते. म्हणून विविध प्रकारच्या रोगांपासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे यासाठी हिवाळ्यामध्ये (Winter) विशेष रोग नियंत्रक उपाययोजना करणे आवश्यक असते.

Sugarcane FRP | उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर द्यावा! शेतकरी संघटना आक्रमक; आंदोलनाचा दिला इशारा

हिवाळ्यामध्ये कोंबड्यांमध्ये दिसणारी लक्षणे

1) श्वास घ्यायला त्रास होणे
2) कोंबड्या तणावाखाली असणे
3) हगवन लागणे
4) खाद्य न खाने
5) चेहरा सुजणे
6) पाय पुढे घेऊन पडून राहणे.

Fertilizer prices । खुशखबर! रब्बी हंगामात खतांच्या किंमती होणार कमी, युरियाच्या दरातही होणार घट

हिवाळ्यात कोंबड्यांना फॉक्स, फाऊल कॉलरा, सालमोनेला इत्यादी प्रकारचे रोग होतात. या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असते. यासाठी खालील उपाययोजना करता येतील.

1) हिवाळ्यात शरीराचे तापमान टिकवण्यासाठी आणि उबदारपणासाठी कोंबड्या अति प्रमाणात खाद्य खातात. यावेळी त्यांच्या आहारात तेल, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे प्रमाण वाढवावे.

2) शेडच्या दोनही बाजूंना असलेल्या जाळ्यांना पडदे लावावेत. तसेच रात्री आणि पहाटे थंडाव्याच्या वेळी हे पडदे बंद करावेत.

3) दुपारच्या वेळेत वातावरणात थोडी उष्णता असते त्यावेळी पडदे उघडावेत.

4) शेड मधील तापमान वाढवण्यासाठी विजेचे बल्ब आणि शेगडीचा उपयोग करावा.

5) कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाण्याची सोय करावी यामुळे त्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण वाढते.

5) हिवाळ्यात कोंबड्यांना जंतांचा प्रादुर्भाव होतो. जंतांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक तीन महिन्याला जंत निर्मूलन करणे गरजेचे असते त्याचबरोबर लिटर नेहमी कोरडे ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.

6) पशुवैद्याच्या सल्ला घेवून नियमितपणे कोंबड्यांना लसीकरण करून घ्यावे.

7) हवामानात ज्या वेळी अचानक बदल होतात त्यावेळी कोंबड्यांना ताण येतो, अशा परिस्थितीत कोंबड्यांच्या आहारात इलेक्ट्रॉलाईट्स आणि ब जीवनसत्वाचा वापर करावा. यामुळे ताण कमी होतो.

Market Yard | लासलगाव आणि बारामती बाजार समिती ठरली अव्वल! पणन संचालनालयाने यादी केली जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *