Pomegranate Price Hike

Pomegranate Price Hike । डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन! एका क्रेटला मिळतोय विक्रमी दर

बातम्या

Pomegranate Price Hike । पुणे : शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. कधी कमी बाजारभाव कधी अवकाळी पाऊस तर कधी पूर यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगले दर (Tomato Price) मिळाले होते. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला होता. अशातच आता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चांदी होत आहे. (Pomegranate Price)

Black Diamond Apple । जगातलं सर्वात महागडं सफरचंद, किंमत जाणून उडतील तुमचे होश

किती मिळाला भाव?

टोमॅटो पाठोपाठ डाळिंबाला अच्छे दिन आले आहेत. डाळिंबाला आतापर्यंतचा पुणे जिल्ह्यातील आळेफाटा बाजार समितीमध्ये सर्वोच्च दर मिळाला आहे. 20 किलोच्या एका क्रेटला 14 हजार 500 रुपयांचा भाव (Pomegranate Rate Hike) मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली आहे. या बाजार समितीत कर्जत येथील शेतकरी विवेक अविनाश रायकर यांनी डाळिंब आणले होते.

Apple job । मानलं रे भाऊ तुला..! आई-वडिलांसाठी सोडली परदेशातील 72 लाखांची नोकरी, आता करतोय शेती

क्रेटला मिळाला उच्चांकी भाव

विवेक रायकर यांच्या वीस किलोच्या एका क्रेटला 14 हजार 500 रुपयांचा भाव मिळाला म्हणजेच एका किलोला 725 रुपये दर मिळाला. दुसऱ्या क्रेटला 11 हजार तर तिसऱ्या क्रेटला 10 हजार रुपये दर मिळाला आहे. तसेच त्यांचा चार नंबरच्या क्रेटला सहा हजार तर पाच नंबरच्या डाळिंबाच्या क्रेटला चार हजार दर मिळाला आहे. या बाजार समितीत डाळिंबाला सर्वोच्च दर मिळाल्याने हे मार्केट चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर

डाळिंबामुळे आले अच्छे दिन

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगले दर मिळाले होते. सध्या टोमॅटोचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. योग्य भाव मिळत नसल्याने ते रस्त्यावर टोमॅटो फेकून देत आहेत. परंतु डाळिंबामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *