Shakira Cow

Shakira Cow । नादच खुळा! ‘या’ शेतकऱ्याची गाय दिवसाला देते 80 लिटर दूध, अशाप्रकारे केले जाते संगोपन

पशुसंवर्धन

Shakira Cow । भारत हा असा देश आहे, जिथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. शेतकरी विविध प्रयोगांसह शेती करत असतात, ज्याचा त्यांना फायदा होतो शेतीचा भारताच्या अर्थव्यस्थेत मोठा वाटा आहे, अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन (Animal husbandry) करतात. पशुपालनामुळे त्यांना आर्थिक फायदा होतो. पण जर या पशुपालनात (Animal husbandry business) जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते.

Warehouse In Village : आता गावागावात सरकार उभारणार गोदाम, शेतकऱ्यांना साठवता येणार शेतमाल; जाणून घ्या जीआर

ही गाय दिवसाला देते 80 लिटर दूध

बाजारात अशा काही गाई-म्हशी आहेत, ज्या सर्वात जास्त दूध देतात, जर तुम्हीही त्यांचे संगोपन केले तर तुम्हाला आर्थिक लाभ होईल. बाजारात अशीच एक गाय आहे, जी दिवसाला 80 लिटर दूध देते. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेलच. होय, पण हे सत्य आहे हरियाणामध्ये (Hariyana) एका पशु मेळाव्यात हि गाय प्रदर्शनात ठेवली होती.

Agricultural News । फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत, धुक्यामुळे फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव; फवारणीचा खर्च वाढला

नावावर केला अनोखा विक्रम

या पशु मेळाव्यामध्ये शेतकरी सुनील आणि शैंकी या दोन भावंडांनी ही गाय प्रदर्शनात आणली होती. शकिरा (Shakira) असे गाईचे नाव आहे. तिने या प्रदर्शनामध्ये तब्बल 80 लीटर 756 मिलीग्रॅम दूध देण्याचा विक्रम आपले नावे केला आहे. दरम्यान, या अगोदर आशिया खंडात सर्वात जास्त 72 लीटर दूध देणाऱ्या एका गायीचा विक्रम होता. आता शकिराने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Wheat Farming । गव्हाच्या पिकात उंदरांनी सुळसुळाट माजवलाय का? शेतकऱ्यांनो ‘या’ जुगाडाचा वापर करा

तिला सर्वात जास्त दूध देणाऱ्या गायीच्या पुरस्काराने तिला सन्मानित केले आहे. शेतकरी सुनील आणि शैंकी हे हरियाणातील झंझाड़ी या गावचे रहिवासी असून ते गेल्या 12 वर्षांपासून दुग्धव्यवसाय करत आहेत. सध्या त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त जनावरे आणि गायी आहेत. 12 वर्षांपासून ते वडिलोपार्जित व्यवसाय करत असून त्यातून त्यांना चांगला लाभ होत आहे.

Congress Grass : शेतातील कांग्रेस गवताने हैराण झालात? करा ‘हा’ रामबाण उपाय, होईल संपूर्ण गवताचा नायनाट

इतकेच नाही तर ते पशुपालनासोबतच शेतीही करत आहेत. त्यांनी आपल्या पशुपालन व्यायवसायाचा मोठा विस्तार केला आहे. त्यांनी अनेक मोठे शेड उभारले आहेत. शकिरा गाय ही 6 वर्षांची असून ती होलस्टीन फ्रिजियन या जातीची आहे. ते 24 तासांमध्ये तीन वेळा दूध काढतात.

Wheat Farming । गव्हाच्या पिकात उंदरांनी सुळसुळाट माजवलाय का? शेतकऱ्यांनो ‘या’ जुगाडाचा वापर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *