Congress Grass : भारतात मोठ्या प्रमाणावर शेती (Agri) केली जाते, शेतकरी अलीकडच्या काळात काही प्रयोग देखील करत आहेत, ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. पूर्वी शेतात फक्त पारंपरिक पिके (Traditional crops) घेतली जात असायची. पण आता शेतकरी आधुनिक पिके (Modern crops) देखील घेऊ लागली. आहेत ज्याचा त्यांना खूप मोठा फायदा होत आहे. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे.
कांग्रेस गवत
शेतात विविध प्रकारचे गवत येते. या गवतावर शेतकरी अनेक उपाय करतात कधी कोळपणी तर कधी औषधांची फवारणी पण अनेक उपाय करूनही हे गवत जात नाही. यातील एक गवत म्हणजे कांग्रेस गवत. या गवतामुळे शेतकरी हतबल होतात. पण आता तुम्ही यावर सहज उपाय करू शकता. या गवताला पांढऱ्या रंगाची फुले येतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या गवताचे एक झाड जवळपास 5000 से 25000 काँग्रेस गवताचे बियाणे तयार करू शकते.
Success Story । दुष्काळी परिस्थितीवर मात करत फुलवली खरबुज शेती, आज होतेय लाखात कमाई
हे बी वजनाने हलके असल्याने ते पावसाळ्यात पाणी, हवेमार्फत सहज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. या गवताला समूळ नष्ट करण्याचा सर्वात प्रभावी आणि रामबाण उपाय हा त्याला बियाणे येण्याचे उपटून टाकावे लागते. या गवताला राउंड अप (Round up) या विषारी तणनाशकाच्या वापराने विशेष फरक पडत नाही. औषधांच्या फवारणीनंतर ते पुन्हा वाढते.
Tur Market Price । कधी वाढणार तुरीचे भाव, जाणून घ्या अभ्यासकांचे मत
करा हा उपाय
त्यामुळे तुम्ही हे गवत उपटून एका जागी जमा करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करू शकता. विशेष म्हणजे हे सेंद्रिय खत पूर्णपणे सुरक्षित असून यापासून काँग्रेस गवताचा कोणताही प्रसार होत नाही. त्याचे खतात रूपांतर होताना पूर्ण विघटन होते. या खतापासून पिकांना पोषक घटक मिळून उत्पादन वाढते. त्यामुळे हे गवत आढळेल त्या वेळी बियाणे येण्याच्या आत त्यापासून खत निर्मिती करावी.
Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?
असे केल्याने तुमचा औषध फवारणीचा खर्च वाचू शकेल आणि तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने खत तयार करू शकता. याचा तुमच्या पिकांना खूप मोठा फायदा होईल. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस गवत हे भारतात सर्वात अगोदर 1956 साली महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आढळून आले होते.
Industrial Electricity । मोठी बातमी! आता औद्योगिक वीज जोडणीच्या खर्चाचा भार उचलणार महावितरण