Organic farming । सध्या शेती व्यवसायात जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशके यांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या अवाजवी वापरामुळे निसर्गातील मुलभूत साधन संपत्ती घटकांच्या दर्जावर विपरीत परिणाम घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, वास्तविक पाहता कृषि उत्पादन व्यवस्थेशी निगडीत असलेल्या मुलभूत निसर्ग संपत्तीच्या -हासाची बीजे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या अवलंबनाने पेरली जाण्याची शक्यता दिवसेदिवस जाणवत आहे. उदा. जमिनीतील सेंद्रिय कर्बात घट होणे, अन्नद्रव्याचा न्हास होणे, अन्नद्रव्याच्या प्रमाणात असंतुलन होणे, माती व पाण्याचे प्रदुषण होणे, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंचे प्रमाण व त्यांच्या विविधतेचा -हास होणे व त्यामुळे रोग आणि किडींच्या समस्येत वाढ होणे इत्यादी.
Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट
या सर्व प्रश्नांवर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करणे हाच एक उत्तम पर्याय शिल्लक राहतो. सातत्त्वाने अधिक उत्पादन देणारी ठराविक पिके वर्षानुवर्ष त्याच जमिनीत घेतली गेल्याने पिकाचे उत्पन्न तर कमी मिळते परंतु, काही नवीन रोग आणि किडींचा शिरकाव पिकांवर दिसू लागला आहे. सध्या रोग आणि किडींच्या बंदोबस्तासाठी एकाच प्रकारच्या बुरशीनाशक आणि किटकनाशकाचा वापर वाढला, त्यामुळे रोग जंतु आणि किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढत गेली त्यामुळे ती नवीन औषधांनी ही आटोक्यात आणणे अवघड होत आहे. यावर उपाय म्हणुन सेंद्रिय पद्धतीने पीक संरक्षण करणे क्रमप्राप्त ठरत आहे. या पार्श्वभुमीवर, सुधारित सेंद्रिय शेतीची संकल्पना पुढे आली, सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते आणि औषधांचा वापर पुर्णपणे बंद करून सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो.
LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ
सेंद्रिय शेतीचे व्यवस्थापन हे निसर्गातील विविध तत्वांच्या उपयोगावर आधारित आहे. या पद्धतीत रासायनिक खतांचा वापर कमी करुन किंवा कृषि उत्पादनावर आधारित उद्योगातून निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थाचा अधिकाधिक व कार्यक्षम पद्धतीने वापर केला जातो. त्याकरीता काडी कचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमुत्र, अवशेष इत्यादी शेतात अथवा शेताबाहेर कुजवून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. शेतात तारा, धंचा यासारख्या हिरवळीच्या पिकाची पेरणी करुन ती जमिनीत गाडली जातात.. डाळवर्गीय पिकांमुळे जमिनीत नत्राचे मोठ्या प्रमाणावर स्थिरीकरण होत असल्यामुळे या पिकांचा अंतर्भाव पीक पद्धतीमध्ये फेरपालट करण्यासाठी केला जातो. नत्र स्थिरीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरीता या पिकांच्या बियाण्यावर विविध जिवाणू संवर्धनाचा अथवा जैविक खतांचा उपयोग केला जातो.
Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन
सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवन चक्रास समजुन घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. सिक्कीम सरकारने २०२५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे ध्येय ठरविले आहे. सेंद्रिय शेती सध्या सुमारे ११० देशामध्ये केली जात असुन तिचा हिस्सा तथा प्रमाण वाढत आहे..
सेंद्रिय शेतीचे तत्त्व काय?
१) आरोग्याचे तत्व माती, हवा, धान्याची रोपे, पशु, पक्षी, मनुष्यप्राणी आणि निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. कोणताही रासायनिक पदार्थ न वापरल्यामुळे हे आरोग्यास पोषक आहे.
२) पर्यावरणीय तत्त्व सेंद्रिय तत्वे ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून वयानुरूप हवी. ती जीवसृष्टीला धरून चालणारी हवी, यामुळे कोणतेही प्रदुषण होणार नाही.
३) निष्पक्षतेचे तत्त्व : सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजुस वळणारी नसावी. निष्पक्षतेची खात्री देणारी असावी.
४) संगोपनाचे तत्त्व यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकाचे संगोपन सुयोग्यरित्या व्हावयास हवे. परिणामी या व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्यरितीने राखले जाईल.
Voter ID Card । मस्तच! आता मोबाईलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड
सेंद्रिय शेतीची गरज का ?
१) रासायनिक खतांचा जास्तीचा वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेत जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे.
२) शेती उत्पादनात घट आणि शेती उत्पादन खर्च वाटू लागला.
३) आधुनिक बियाण्यामुळे पारंपारिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. (१४) सेंद्रिय शेती पद्धतीचा विचार केला तर सेंद्रिय शेती ही मुलभूत गरजांवर आधारित आहे. त्यासाठी सेंद्रिय शेती पद्धत शेतीप्रधान देशातील प्रत्येक शेतकऱ्याने समजुन घेऊन तिची अंमलबजावणी केली पाहिजे..
५) नवीन बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन देशात १९६६ नंतर हरीतक्रांतीचे वारे जोराने वाहू लागले. सध्या शेती उत्पादनावरील खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे.
सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये:
- स्थानिक गोष्टींचा व पुनर्वापर करण्याजोग्या वस्तूंचा वापर
- मातीचा आरोग्यस्तर कायम ठेवण्यास मदत.
- पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्वांचा व सभोवतालच्या सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर
- निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी, अनैसर्गिक वस्तु, निसर्गाशी अनोळखी जीवांचा उपयोग न करणे…
- शेतीवर अवलंबुन असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते. पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका,
- अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत
- आर्थिक उत्पन्नात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन,
सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या भौतिक गुणधर्माशी निगडीत असून ते जमिनीचे गुणधर्म संतुलित आणि नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीत योग्य प्रमाणात हवा आणि पाणी यांची उपलब्धता वाढल्यामुळे जमिनीत जीवाणूंची संख्या वाढते व जीवाणूंच्या कार्यशक्तीत वाढ होते. सेंद्रिय पदार्थाद्वारे सेंद्रिय कर्बाचा पुरवठा संतुलित करता येतो. सेंद्रिय पदार्थामध्ये शेतीसाठी वापरात येणारी भरते म्हणजे शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, शेळ्या मेंढ्याचे लेंडी खत, गव्हाचा भुसा, करडईचा भुसा, शेतातील पिकांचे अवशेष, हिरवळीचे खत इत्यादीचा समावेश होतो. एकुण सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण विघटनानंतर ५० ते ५८ टक्क्यापर्यंत असते. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतातच पण जैविक गुणधर्मात वाढ होऊन वनस्पतीच्या अन्नद्रव्याची उपलब्धताव कार्यक्षमता निश्चित वाढविली जाते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन सेंद्रिय शेतीसाठी शेणखत, कंपोष्ट खत, कोंबडी खत, लेंडी खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत या भरखतांचा आणि अखाद्य पेंडीचा जोरखतासाठी वापर करता येतो. सेंद्रिय शेतीत उपयुक्त जीवाणूचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, ॲसिटोबॅक्टर, पीएसबी या जीवाणू खतांचा पिकानुसार पूरक खते म्हणून वापर केल्याने उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ होते. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीत योग्य पीक पद्धतीचा अवलंब केल्याने जमीनीचा पोत सुधारून आर्थिक फायदा होतो. सेंद्रिय शेतीत पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे लागते. त्याचबरोबर बायोडायनॅमिक, जीवामृत, बीजामृत, पंचगव्य इत्यादींचा वापर सेंद्रिय शेतीत करणे शक्य होत आहे. याशिवाय जैविक पीक संरक्षण शिफारसींचा वापर रोग आणि किडीच्या नियंत्रणासाठी करावा लागतो.
Measuring Land । मस्तच! एकही रुपया खर्च न करता मोबाइलवर मोजता येईल जमीन, कसे ते जाणून घ्या
बीजामृत – (बीजप्रकिया) बियाणे बीजप्रकियासाठी बीजामृत वापरता येते. बीजामृत तयार करण्यासाठी देशी गाईचे शेण १ किलो, गोमूत्र १ लिटर दूध १०० मिली, चुना ५० ग्रॅम, पोयटा माती ५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा व्हेरोडी १०० ग्रॅम हे मिश्रण रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरता येते.
जीवामृत – गाय किंवा बैलाचे शेण १० किलो, १० लिटर गोमूत्र, २ किलो गूळ, बेसनपीठ २ किलो, १ किलो बनातील माती है मिश्रण प्लास्टिकच्या ड्रममध्ये २०० लि. पाण्यात ५-७ दिवस आंबवून दररोज ३ वेळा मिश्रण ढवळून घेणे. सदरचे मिश्रण १ एकर क्षेत्रासाठी पाण्यावाटे पिकास देता येते.
अमृतपाणी – गाईचे शेण १० किलो, गाईचे तुप २५० ग्रॅम आणि गुळ ५०० ग्रॅम हे मिश्रण २०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले अमृतपाणी ३० दिवसांच्या अंतराने १ एकर क्षेत्रासाठी पाण्याद्वारे द्यावे.