Havaman Andaj । हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे या ठिकाणी पुढील 24 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हवामान खराब असल्यामुळे याचा परिणाम थेट पुण्यावर होणार आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पुण्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता हावमान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार असा असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Havaman Andaj)
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर भागाला येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या
मुंबईत पाऊस
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुपार आणि संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो असे देखील हवामान तज्ञांनी सांगितले आहे. दरम्यान राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून ४ ऑक्टोबर नंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती देखील शिल्पा आपटे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरेल असा देखील अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Onion Rate । कांद्याचे दर वाढले? जाणून घ्या बाजारातील परिस्थिती