Havaman Andaj । राज्यात यंदाच्या वर्षी जूनमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला. जूनच्या शेवटी मान्सूने हजेरी लावली त्यानंतर जुलै महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बरसला आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने चांगलीच विश्रांती घेतली. ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची शेतपिके जळू लागली. अनेक ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेतपिके नष्ट देखील झाली. मात्र सप्टेंबर महिना सुरू होताच पावसाने हजेरी लावली. (Havaman Andaj)
Export Business । ‘या’ सोप्या पद्धतीने विका परदेशात शेतमाल, परवाना कसा काढावा? जाणून घ्या
गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून संपूर्ण राज्यभर चांगल्या पावसाला सुरुवात झाली. राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली. त्याचबरोबर नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा मोठा प्रश्न मिटला. दरम्यान, आता पुन्हा एकदा पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उद्या १ ऑक्टोबरला रविवारी विदर्भ, मराठवाडा आणि कोकणामधील काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर देखील कमी होईल असा हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र खरीप पिक वाया गेले असले तरी रब्बी पिकाला याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, सध्या शेतकऱ्यांचा सोयाबीन काढण्यात आला आहे. मात्र पावसाचा जोर अजून दोन दिवस राज्यात कायम असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्याची घाई करू नये. २ ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढावा असे आव्हान देखील करण्यात आले आहे.
Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर