Ujani Dam Water Level । गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून राज्यभर पाऊस सक्रिय झाला. आता गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आहे तरी पावसाचा जोर कायम दिसत आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. यामध्येच सोलापूर, पुणे, अहमदनगर या तीन जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण आता 31 टक्के भरले असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील बहुतेक धरणं फुल्ल झाली आहेत. त्यामुळे दौंड वरून 20 हजाराहून अधिक क्युसेकचा विसर्ग उजनीत येत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी पाऊस नसल्यामुळे या धरणांमध्ये खूप कमी पाणी साठा होता. मात्र आता झालेल्या पावसामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने उजनी आता 30 टक्क्यांवर पोहोचले आहे. मागील पाच दिवसात या धरणामध्ये जवळपास पाच टीएमसी पाणी आले आहे. सोलापूर,पंढरपुर या शहरासाठी उजनी मधून पाणी सोडले होते मात्र यामध्ये दिलासदायक स्थिती म्हणजे जेवढे पाणी सोडले तेवढेच पाणी आता धरणात जमा झाले आहे.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बहुतेक धरणं भरली आहेत. त्यामुळे उजनीतील विसर्ग अजून वाढेल असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण देखील फुल्ल भरले आहे, त्यामुळे या धरणातून देखील खाली पाणी सोडले जात आहे.
Soybean Rate । सोयाबीनला आज किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
उजनी धरणाच्या एकूण पाणीसाठ्याबद्दल पाहिले तर उजनी धरणामध्ये सध्या एकूण 80 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा 17 टीएमसी पर्यंत आहे. उजनी धरणामध्ये पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.