Forbes Billionaires List । जगातील सर्वात जास्त अब्जाधीशांची संख्या अमेरिकेमध्ये आहे. फोर्ब्सच्या यादीतील टॉप 10 श्रीमंतांपैकी 9 अब्जाधीश हे अमेरिकेमधील आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्था मंदीच्या समस्येचा सामना करत असून नुकतीच अर्थव्यवस्था बंद पडण्यापासून वाचली आहे. असे असले तरी जगातील श्रीमंतांच्या यादीत अमेरिकन अब्जाधीशांचे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. (Forbes India Rich List 2023)
आता श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाने आपले स्थान तयार केले आहे. सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. नुकतीच फोर्ब्सकडून भारतातील 100 सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या नावांची यादी (Forbes India Rich List) जाहीर करण्यात आली आहे. यात एका शेतकऱ्याच्या मुलाच्या नावाचा समावेश आहे. जाणून घेऊयात शेतकऱ्याच्या मुलाबद्दल आणि त्याच्या संपत्तीबद्दल संपूर्ण माहिती.
किती आहे संपत्ती?
केपी रामासामी (KP Ramasamy) असे या शेतकऱ्याच्या मुलाचे नाव असून त्यांचे वय 74 वर्ष आहे. ते कापड आणि साखर उत्पादक केपीआर मिलचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचा 100 वा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती 19 हजार 133.7 कोटी रुपये इतकी आहे. दरम्यान, श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आहेत.
Dairy Business । मोठी बातमी! दूध संस्थांमधील वजन काटा रद्द होण्याची शक्यता
केपी रामासामी यांना त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. अपुरे शिक्षण असताना 1984 मध्ये त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या कापड निर्यात व्यवसायाचा पाया घालून घवघवीत यश मिळवले. त्यांनी 2013 मध्ये साखर उत्पादन सुरू केलेआहे. आज ते केपीआर मिलमध्ये कपडे आणि साखरेशिवाय इथेनॉलचे उत्पादन घेतात.
Havaman Andaj । सावधान! पुढचे तीन दिवस ‘या’ भागाला बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा