Modern Agricultural Machine

Modern Agricultural Machine । भारीच की राव! ‘या’ यंत्राच्या मदतीने काही तासात होते गव्हाची कापणी, किंमतही आहे खूपच कमी

तंत्रज्ञान

Modern Agricultural Machine । शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते. बाजारात या पिकांना चांगली मागणी असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तरुणवर्ग अभ्यास करून आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. काहीजण तर गलेगठ्ठ पगारावर लाथ मारून शेती करतात.

Dairy Business । मोठी बातमी! दूध संस्थांमधील वजन काटा रद्द होण्याची शक्यता

दरम्यान, आता अनेक यंत्रे ( Agricultural Machine) बाजारात येऊ लागली आहेत. ज्याची किंमतही खूप कमी आहे आणि ज्याच्या मदतीने शेतीतील कामे झटपट होऊ लागली आहेत. शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. सध्या अशी दोन आधुनिक कृषी यंत्रे बाजारात आली आहेत, या यंत्रामुळे गव्हाची काढणी अतिशय सोपी होते. जाणून घेऊयात या यंत्राबद्दल सविस्तर माहिती.

Havaman Andaj । सावधान! पुढचे तीन दिवस ‘या’ भागाला बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

ट्रॅक्टर चलित रीपर बाईंडर

या यंत्राद्वारे झाडे कटरच्या मदतीने कापण्यात येतात. यानंतर ती पुलांमध्ये बांधली जातात. पुढे हे ट्रान्समिशन सिस्टमद्वारे एका बाजूला सोडण्यात येते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या यंत्राच्या साहाय्याने कापणी आणि बांधणीचे काम खूप स्वच्छतेने करण्यात येते. (Tractor Driven Reaper Binder)

Navratri 2023 । काय आहे शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व? जाणून घ्या

कार्यक्षमता: या यंत्राच्या मदतीने एकूण 0.40 हेक्टर/तास या दराने कापणी केली जाते. त्यामुळे कापणीचा खर्च ताशी १०५० रुपये इतका येतो.

किंमत: किमतीचा विचार करायचा झाला तर या मशीनची अंदाजे किंमत 2 ते 3 लाख रुपये इतकी आहे.

Snakes Farming । ऐकावं ते नवलच भाऊ! येथे सापाचीही करतात शेती, कसं असतं नियोजन? जाणून घ्या

स्वयंचलित अनुलंब कन्व्हेयर रीपर

लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना गव्हाची कापणी करण्यासाठी हे यंत्र खूप आहे. या यंत्रामध्ये समोरील बाजूला एक कडक पट्टी बसवण्यात येते. तसेच तिच्या पाठीमागे ट्रान्समिशन सिस्टीम बसवण्यात येते. इतकेच नाही तर या रीपरमध्ये सुमारे 5 हॉर्स पॉवरचे डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे, जे चाके आणि कटर बार चालवते. (Automatic Vertical Conveyor Reaper)

Pumpkin Farming । बापरे! पाच फुटांचा भोपळा, अशाप्रकारे करा लागवड; मिळेल भरघोस नफा

कार्यक्षमता: या यंत्राद्वारे काढणीसाठी अंदाजे 1100 रुपये इतका प्रति हेक्टर खर्च येतो. याची कार्य क्षमता 0.21 हेक्टर प्रति तास इतकी आहे.

किंमत: किमतीचा विचार करायचा झाला तर या मशीनची अंदाजे किंमत 100000 रुपये इतकी आहे.

Egg Production । गावरान अंड्याच्या उत्पादनातून दुर्गम गावांना मिळाले आर्थिक बळ, लोक घेतायेत हजारोंचे उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *