Pumpkin Farming

Pumpkin Farming । बापरे! पाच फुटांचा भोपळा, अशाप्रकारे करा लागवड; मिळेल भरघोस नफा

कृषी सल्ला

Pumpkin Farming । हल्ली शेती करण्याची पद्धत बदलली आहे. तशीच पिके घेण्याचीही पद्धत बदलली आहे. शेतकरी आता पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके घेऊ लागले आहेत. ज्याच्या विक्रीतून त्यांना लाखो रुपयांचा फायदा होऊ लागला आहे. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. नियोजन करणे गरजेचे आहे.

Success Story । डाळिंबाच्या शेतीने शेतकऱ्याचे नशीबच बदलले; काही वेळातच झाला मालामाल; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या भाज्या बनत असतात. अनेकांना भोपळा खायला खूप आवडतो. भोपळा खाण्याचे खूप फायदे आहेत, त्यामुळे डॉक्टरही रुग्णांना आवर्जून भोपळा खाण्याचा सल्ला देतात. भोपळ्यापासून (Pumpkin Cultivation) विविध आजारांवर औषधे बनवली जातात. तुम्ही कधी पाच फूट लांब असणारा भोपळा पाहिला आहे का? उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथील मंगलयतन विद्यापीठाच्या कृषी विद्याशाखेने पाच फूट लांब भोपळा पिकवला आहे. (Pumpkin Farming Information)

Egg Production । गावरान अंड्याच्या उत्पादनातून दुर्गम गावांना मिळाले आर्थिक बळ, लोक घेतायेत हजारोंचे उत्पन्न

मिळेल जबरदस्त नफा

सध्या त्याचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. नरेंद्र शिवानी असे या भोपळ्याच्या जातीचे नाव आहे. कृषी विद्याशाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बियाणे मिळविण्यासाठी हा भोपळा तयार केला असून शेतकरी यातून चांगला नफा मिळवू शकतात. या अनोख्या प्रयोगाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी.के.दशोरा यांनी माहिती दिली आहे.

Success story । हॉटेल व्यावसायिकाने घेतला शेती करण्याचा निणर्य! झेंडूची लागवड केली, कमावतोय लाखो रुपये; कस केलं नियोजन?

बोलताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी आणि शुद्ध बियाणे तयार करण्यासाठी या जातीची लागवड केली आहे. इतर भाज्यांपेक्षा ही एक अनोखी भाजी आहे जी औषध, वाद्य, सजावटीसाठी वापरतात.” या जातीचे उत्पादन ७००-८०० क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. यात प्रथिने ०.२ टक्के, चरबी ०.१ टक्के, फायबर ०.८ टक्के, साखर २.५ टक्के, आर्द्रता ९६.१ टक्के आणि ऊर्जा १२ किलो कॅलरी आढळते. तुम्ही या वाणाची लागवड मार्च ते एप्रिल दरम्यान १.५ ते २.५ मीटर अंतर घेऊन करू शकता.

Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *