Success Story

Success story । हॉटेल व्यावसायिकाने घेतला शेती करण्याचा निणर्य! झेंडूची लागवड केली, कमावतोय लाखो रुपये; कस केलं नियोजन?

यशोगाथा

Success story । हल्ली अनेकांमध्ये शेतीची आवड निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे ते शेतीत पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने उत्पादन घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे तरुण पिढी देखील गलेगठ्ठ पगार असलेली नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. एका हॉटेल व्यावसायिकाने शेतीत यशस्वी प्रयोग केला आहे. यशस्वी उद्योजकासोबत तो एक यशस्वी शेतकरी बनला आहे.

Success story । नादच खुळा! ‘या’ गावातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फुलविली रंगबिरंगी फुलांची शेती

नितीन अभ्यंकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते मालगुंड येथे राहतात. ते हॉटेल व्यावसायिक आहेत. मागील तीन वर्षे ते झेंडू लागवड करत आहेत. त्यांनी आपल्या १६ गुंठे क्षेत्रावर पन्हाळा येथील नर्सरीतून रोपे आणून झेंडूची लागवड केली आहे. कलकत्ता मारीगोल्ड या वाणाचा केशरी आणि पिवळ्या रंगाचा झेंडू लावला आहे. वाफे तयार करून त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपरचे आच्छादन केले आहे.

Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर

यामुळे तण उगवत नाही. लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यात झेंडू काढायला सुरुवात होते. गणपतीपुळे, जाकादेवी, मालगुंड, रत्नागिरीमध्ये झेंडू विक्री करतात. यंदा त्यांना अडीच ते तीन टन झेंडू उत्पादन मिळेल. सणासुदीच्या दिवसात त्यांच्या झेंडूला चांगला भाव मिळेल. झेंडू काढणीनंतर मिरची, कोबी, फ्लॉवरची लागवड ते करतात.

Heligan Pineapple । ‘हे’ आहे जगातलं तिसरं सर्वाधिक महागडं फळ, किंमत जाणून व्हाल हैराण

दरम्यान, मागील वर्षी त्यांना ३५० ते ४०० किलो कोबीचे उत्पादन मिळाले होते. लाल मातीत फ्लॉवर चांगला येतो. हिरव्या मिरचीलाही चांगली मागणी असते, त्यामुळे ते ‘सीतारा गोल्ड’ या वाणाची लागवड करतात. महत्त्वाचे म्हणजे एकूण ८० ते ८५ दिवसात मिरची उत्पादनाला सुरुवात होते. इतकेच नाही तर त्यांनी दोनशे हापूस कलमे असून दीडशे नारळांची लागवड देखील केली आहे. या कामात त्यांना वडील, मुलगा यांची मदत होते.

Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! ‘या’ भागात हवामान खात्याने दिला जोरदार पावसाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *