Heligan Pineapple

Heligan Pineapple । ‘हे’ आहे जगातलं तिसरं सर्वाधिक महागडं फळ, किंमत जाणून व्हाल हैराण

शेतीपूरक व्यवसाय

Heligan Pineapple । शेतकरी आता आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. यामुळे त्यांना खूप आर्थिक फायदा होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही पिकाचे उत्पन्न घेण्यापूर्वी त्यासाठी महत्त्वाचे असते ते म्हणजे नियोजन. नियोजन जर योग्य असेल तर उत्पन्न चांगले मिळते. परंतु अनेकदा काही पिकांना चांगले बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते.

Havaman Andaj । नागरिकांनो सावधान! ‘या’ भागात हवामान खात्याने दिला जोरदार पावसाचा इशारा

अनेकजण अननसाची शेती करतात. चवीने आंबट गोड असणाऱ्या अननसाला (Heligan Pineapple Farming) बाजारात चांगली मागणी असते. बाजारात असे एक अननस आहे, ज्याची किंमत तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हेलिगन अननस असे याचे नाव आहे. याची जगातील तिसरं सर्वाधिक महागडं फळ (Heligan Pineapple Price) म्हणून गणना केली जाते. याची लागवड करण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागतो.

Government Scheme । शानदार योजना! आता ‘या’ लोकांना मिळणार कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज

किंमत

ब्रिटनच्या हेलिगनमधील द लॉस्ट गार्डनमध्ये या अननसाची लागवड केली जाते. हे अननस तयार होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. महत्त्वाचे म्हणजे या अननसाची बाजारात विक्री केली जात नाही, तर लोक भेट देण्यासाठी या अननसाची खरेदी करत असतात. बहुधा हायप्रोफाईल लोक ते भेट म्हणून देण्यासाठी खरेदी करतात. परंतु जर त्याचा लिलाव झाला तर त्याची किंमत 10 लाख रुपये असू शकते.

Wheat Farming । ‘हे’ आहे गव्हाचे उत्तम वाण, पेरणी केल्यास मिळेल भरघोस उत्पादन

अशी करतात शेती

त्याची लागवड लाकडी भांड्यात केली जाते. या भांड्यांची रचना वेगळ्या पद्धतीने केली जाते. एका भांड्यातून केवळ एक अननस तयार होते, जे परिपक्व होण्यासाठी एकूण दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. या पिकासाठी घोड्याचे खत टाकले जाते. (Heligan Pineapple Cultivation)

Agriculture News । फवारणीसाठी शेतकऱ्याचं अनोखं जुगाड! एक दिवसात 2 व्यक्तींना करता येणार 10 ते 15 एकर फवारणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *