Success story । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
शेतकरी आता डाळिंब लागवड करू लागले आहेत. डाळिंबाच्या पिकातून चांगली कमाई करता येत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी फळबागांची लागवड करत आहेत. बीड जिल्ह्यातील पांढरवाडीचे शेतकरी अशोक मसुराम जाधव यांनी डाळिंबाची लागवड (Pomegranate Cultivation) केली आहे. त्यातून त्यांना थोड्याशा उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र त्यांना तीन एकरमध्ये साडेसात लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. (Farmer Success Story)
जाधव यांना 19 एकर शेती असून ते या शेतीत पारंपारिक पिके घेत होते. शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. जाधव यांनी सर्वात अगोदर आधुनिक शेतीची माहिती घेतली. परंतु त्यांच्याकडे डाळिंबासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे एका राष्ट्रियीकृत बँकेकडून सिंचन कर्ज घेतले.
800 रोपांची लागवड
लागवडीसाठी त्यांनी 800 डाळिंबाची रोपे आणून ती 3 एकर क्षेत्रावर लावली. या रोपांचे अंतर 12 × 7 व 12 × 9 ठेवले. त्यांना सर्वात अगोदर डाळिंबाच्या शेतीतून अडीच लाख रुपयांचे उत्पादन घेता आले. आता त्यांचे हेच उत्पादन 9 लाखांवर गेले आहे. त्यांना आता डाळिंबातून आणखी उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.
Guava Rates । डाळिंबानंतर पेरुला आले अच्छे दिन, किलोला मिळाला ‘इतका’ दर