Success Story

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

यशोगाथा

Success Story । असं म्हटलं जात की नोकरी आणि शेती एकत्र करता येत नाही. जर योग्य नियोजन आणि अपार कष्ट केलं तर कोणतेही काम अशक्य होतच नाही. विशेष म्हणजे शेतकरी आता विविध प्रयोग शेतीत (Farmer Success Story) करू लागले आहेत. अलीकडच्या काळात फक्त अशिक्षित लोकच नाही तर सुशिक्षित लोकही शेती (Farming) करू लागले आहेत. त्यातुन त्यांना चांगला नफाही मिळत आहे.

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

एका शिक्षकाने चक्क तीन एकरात पेरूची लागवड (Cultivation of guava) करत लाखो रुपयांचं उत्पादन घेतलं आहे. राजेंद्र मगर असे या पेरूची (Guava) बाग फुलवणाऱ्या शिक्षकाच नाव आहे. ते धाराशिव (Dharashiv) तालुक्यातील वाघोली येथे राहतात. दुष्काळी (Drought) भाग म्हणून खरतर या जिल्ह्याची ओळख आहे. मगर यांनी तीन एकरात चक्क 24 लाख रुपयांच्या पेरूचं (Guava Cultivation Information) उत्पादन मिळवलं आहे.

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

अशी मिळाली प्रेरणा

राजेंद्र मगर हे विद्यार्थ्यांना शिकवतात. तसेच ते सुटीच्या दिवशी विविध प्रयोग शेतीत करतात. अडीच वर्षापूर्वी मगर यांनी मोहोळ येथील एका शेतकऱ्याकडे व्हीएनआर जातीच्या पेरूची बाग पाहिली. पेरू लागवडीतून (Guava Cultivation) लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, त्यामुळे त्यांनी रायपूर (छत्तीसगड) येथून दीड हजार रोपे आणून त्यांची लागवड केली. मार्च 2022 मध्ये तीन एकरावर पेरूची लागवड करून त्यांची मे 2023 मध्ये छाटणी केली

Havaman Andaj । चक्रीवादळामुळे शेतकरी अडचणीत! ‘या’ ठिकाणी पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

15 ऑक्टोबरपासून फळधारणेला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत तीन एकरात तब्बल 33 टन फळांतून 24 लाखांचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. मगर यांना एकूण नऊ एकर जमीन आहे. यात ते आंब्याची शेती करत असायचे. परंतु, दोन वर्षांपूर्वी त्यांनी मोहोळ तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी समाधान भोसले याची शेती पाहिली आणि पेरूची बाग लावण्याचा निश्चय केला.

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

कमाई

छत्तीसगडमधून पेरूची रोपं आणून त्याची तीन एकर शेतामध्ये लागवड केली, एकूण 1475 रोपांसाठी त्यांना एका रोपसाठी 200 रुपये खर्च आला आहे. सात बाय बारावर झाडं लावली. ठिबकमधून प्रत्येक सात दिवसाला औषध दिले. विशेष म्हणजे खत, औषधं फवारणीसाठी वेळापत्रक तयार केले. तीन एकरात 33 टन फळांतून 24 लाखांचे उत्पादन मिळाले आहे.

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *