Havaman Andaj

Havaman Andaj । चक्रीवादळामुळे शेतकरी अडचणीत! ‘या’ ठिकाणी पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

हवामान

Havaman Andaj । यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

या पावसाचा कहर आजही देशासह राज्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याच्या मतानुसार, येत्या 24 तासांत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडू शकतो. तर राज्याच्या इतर भागात वातावरण कोरडं राहील. सोलापूर, उस्मानााद, नांदेड, अहमदनगर आणि लातूर या ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, शिवाय वर्ध्यात देखील पावसाची हजेरी पाहायला मिळेल.

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

शेतकऱ्यांवर मोठं संकट

महत्त्वाचे म्हणजे वर्ध्यात ढगाळ वातवरण कायम राहत आहे, याचा सर्वात मोठा फटका तुरीच्या पिकाला बसत आहे. अवकाळी पावसात तुरीचा बहार गळाला असून ढगाळ वातवरण आणि त्यात पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुरीच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

शिवाय सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. पावसामुळे द्राक्षाचे घड कुजू लागले असून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे आता सर्व भागातून सरकारकडून याची दखल घेऊन तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या

एनडीआरएफची टीम तैनात

तसेच चक्रीवादळाचा हा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहेत. हे वादळ 5 डिसेंबर रोजी ताशी 110 किमी वेगाने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकू शकते, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. वादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि आसपासच्या सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालच्या किनारी भागातही दिसून येईल. त्याचवेळी, मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि ओडिशामध्ये एनडीआरएफची टीम तैनात केली.

Cyclone Michaung । सर्वात मोठी बातमी! मिचॉन्ग चक्रीवादळामुळे या शहरांना मोठा फटका बसणार; जनजीवन विस्कळीत होणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *