Cyclone Michaung । बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषत: चेन्नईमध्ये या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उग्र रूप धारण करत असून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकत आहे.
Expensive Tree । बापरे! तब्बल शंभर कोटींचं झाड, असते 24 तास सुरक्षा
हे चक्रीवादळ मंगळवारी दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, नागापट्टिनम, कुड्डालोर आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. चेन्नईचा बहुतांश भाग पाण्यात बुडाला आहे. किनारी भागात कलम 144 लागू आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ 3 डिसेंबर रोजी रात्री 11:30 वाजता पुडुचेरीपासून 210 किमी पूर्व-ईशान्य, चेन्नईच्या 150 किमी पूर्व-दक्षिण-पूर्वेस केंद्रित होते. पावसाची परिस्थिती अशी आहे की चेन्नई विमानतळ आणि कलांदूर सबवे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे चेन्नई विमानतळावरील किमान 10 उड्डाणे बेंगळुरूच्या दिशेने वळवण्यात आली आहेत.
चेन्नई, चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. चक्रीवादळ मिचॉन्ग मंगळवारी दक्षिण आंध्र प्रदेशात धडकेल, परंतु त्याआधी ते तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर पोहोचेल. (Cyclone Michaung)
एनडीआरएफची टीम तैनात
त्याचबरोबर हा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकारेही सतर्क आहेत. हे वादळ 5 डिसेंबर रोजी ताशी 110 किमी वेगाने तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. वादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि आसपासच्या सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालच्या किनारी भागातही दिसून येईल. त्याचवेळी, मिचॉन्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू आणि ओडिशामध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान