Crop Insurance Scheme । शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतो. काही वेळा राज्यात कोरडा दुष्काळ पडतो, तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना राज्याला सहन करावा लागतो. परंतु, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत असतो. यावर्षी रब्बी हंगामात देशासह राज्याच्या भागात पावसाने (Rain in Maharshtra) पाठ फिरवली. अशातच खरीप हंगामात काही ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला (Heavy Rain in Maharshtra) आहे.
Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता सरकारने काही योजना (Government Schemes) सुरु केल्या आहेत. सरकारने पीक विमा योजनेला सुरुवात केली आहे. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव विहित मुदतीत आपला पीक विमा (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) भरता आला नाही. या शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ज्वारीसह आंबा, काजू, संत्रा आदी फळपिकांचा पीक विमा (Insurance Scheme) भरण्याच्या मुदतीत सरकारने वाढ केली आहे.
Onion Crop । कांद्यांने केला वांदा! रोपांची किंमत वाढल्याने शेतकरी हतबल
या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलच्या माध्यमातून 4 आणि 5 डिसेंबर 2023 रोजी पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. ज्वारी, आंबा, काजू आणि संत्रा या पिकांसाठी पिक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2023 होती. त्यात आता 5 डिसेंबर 2023 पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला नसेल, अशा शेतकऱ्यांनी आपला पीक विमा लवकरात लवकर भरावा, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
Governmnet Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बांबू लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान
दरम्यान, विविध तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता आला नव्हता. याची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी किमान दोन दिवस वरील पिकांचा विमा भरण्यासाठी पोर्टल सुरू करावे, अशी विनंती केंद्राकडे केली होती. आता ही विनंती केंद्र सरकारने मान्य केली आहे. त्यानुसार चार व पाच डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त दिवस अर्ज करता येणार आहे.
Grain Dryer । मस्तच! बाजारात आले स्वस्त धान्य वाळवणी यंत्र, किंमत आहे फक्त ‘इतकीच’
प्रधानमंत्री पीक विमा योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सरकारने हवामानावर आधारित फळपिक योजनेला सुरुवात केली आहे. बागायत गहू, हरभरा, रब्बी कांद्यासाठी 15 डिसेंबर, उन्हाळी भात आणि भुईमूग पिकांसाठी 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येईल. यात आंबा, काजू आणि केळी या फळ पिकांचा समावेश आहे.
Milk Price । राज्यात दुधाचे दर का कमी होतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत