Expensive Tree । तुमच्या आसपास अनेक झाडे असतील. या प्रत्येक झाडांची नावे वेगवेगळी आहेत. त्यांची जशी नावे वेगळी आहेत, तसे त्यांचे फायदेही वेगवेगळे आहेत. यातील काही झाडे फक्त घराला शोभा यावी, यासाठी लावली जातात. प्रत्येक झाडांच्या किमती वेगळ्या आहेत. परंतु, तुम्ही कधी तब्बल शंभर कोटींचं झाड (One hundred crore tree) पाहिलं आहे का? इतकेच नाही तर या झाडाला 24 तास सुरक्षा असते. (Most Expensive Tree)
हे झाड कोकणात आहे. या झाडाची किंमत चक्क १०० कोटी रुपये आहे. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यात चाफवली गावाच्या देवराईत हे झाड सापडते. दीडशे वर्षांपूर्वीचं हे झाड आहे. रक्तचंदनाचं (Raktchandan) हे झाड आहे. खरंतर रक्तचंदन (Raktchandan Tree) फक्त कर्नाटक आणि तामिळनाडूमधील विशिष्ट भागांत आढळते. असे असल्याने हे झाड कोकणात कोठून आले ते समजत नाही. (Raktchandan Tree Price)
Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
काही वर्षांपूर्वी हे झाड चोरण्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा आहे. म्हणून या झाडाच्या सुरक्षेसाठी गावकरी आणि वनविभाग 24 तास सतर्क असतो. या अतिदुर्मिळ झाडाला आंतरराष्ट्रीय बाजारात (International markets) खूप महत्त्व आहे. रक्तचंदनाची 5 ते सहा हजार रूपये किलो या किमतीने विक्री केली जाते. खासकरून चीन या देशात रक्तचंदनाला खूप मागणी आहे.
Onion Crop । कांद्यांने केला वांदा! रोपांची किंमत वाढल्याने शेतकरी हतबल
रक्तचंदनाचे फायदे
रक्तचंदनाचा मुख्यतः आयुर्वेदिक औषधं, मूर्तींसाठी वापर केला जातो. सुज किंवा मुका मार लागला तर रक्त चंदनाचा वापर केला जातो, अशी माहिती आयुर्वेदात पाहायला मिळते. साहजिकच हे झाड फायदेशीर असल्याने त्याची मागणी जास्त असते आणि मागणी जास्त असल्याने या झाडाला कोट्यवधी रुपयांची किंमत (Raktchandan Price) असते.
Governmnet Schemes । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! बांबू लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान
कोकणात कसे आले झाड?
खूप वर्षांपूर्वी कोकणातील कातकरी समाज जंगलात जात असायचा. तेव्हा त्यांच्या बैलाची प्रकृती बिघडली, त्यामुळे या लोकांनी या झाडाची साल उगाळून बैलाला दिली आणि बैल ठणठणीत झाला. त्यामुळे हे झाड औषधी आहे अशी बाब संपूर्ण कोकणात वाऱ्यासारखी पसरली. हे झाड औषधी आणि दुर्मिळ आहे, त्यामुळे हे तोडायचं नाही असा निर्णय एकमुखाने घेतला असल्याचे गावकरी सांगतात. यावर काही अभ्यासकांकडून अभ्यास केला जात असून हे झाड रक्तचंदनाचं असल्याचं सांगितलं गेलं आहे. परंतु, हे झाड कुणी लावलं, या ठिकाणी कसं आलं याची काहीच माहिती नाही.
Grain Dryer । मस्तच! बाजारात आले स्वस्त धान्य वाळवणी यंत्र, किंमत आहे फक्त ‘इतकीच’