Samriddhi yojana । सर्वसामान्य जनतेसाठी सरकार सतत विविध योजना (Government Schemes) सुरु करत असते. या योजना जनतेसाठी खूप फायदेशीर आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. पण अशा काही योजना आहेत ज्या जनतेला माहिती नसतात, त्यामुळे त्यांना या योजनांची माहिती मिळत नाही. सरकारची अशीच एक योजना आहे, जिच्याअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ होत आहे. (Government Schemes for Women)
Amul Dairy । 36 लाख शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या अमूल डेअरीची 50 वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर
महिला समृद्धी कर्ज योजना
खास महिला बचत गटांसाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून ‘महिला समृद्धी कर्ज योजना’ (Mahila Samriddhi Loan Scheme) राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांना उद्योगासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेवर केवळ चार टक्के दराने व्याज आकारण्यात येत आहे. या सरकारी योजनेंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. (Mahila Samriddhi Loan Scheme Benefits)
दरम्यान, अल्पसंख्याक समाजातील महिलांना महिला समृद्धी योजनेंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिला समृद्धी कर्ज योजनेंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी महिलांना चार टक्के व्याजदराने ५ लाख ते २० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Animals Subsidy Scheme । आता बिनधास्त पाळा घोडे, गाढव; सरकार देतंय 50 लाखांपर्यंतचं अनुदान
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराकडे रहिवाशी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, ई-मेल आयडी, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, बँकेचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, व्यवसाय प्रकल्पाच्या खर्चाचा अंदाजपत्रक असावे.
Success Story । युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग! एक हेक्टर भाजीपाल्यातून होतेय लाखोंची कमाई
जाणून घ्या अटी
लाभार्थी मागासवर्गीय किया अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा. बचत गट व मागासवर्गीय घटकातील महिला उद्योजकांना कर्ज मिळेल. लाभार्थीचे वय किमान १८ ते ५० वर्षे हवे. बचत गटाशी जुळलेल्या महिलानी उद्योग सुरू करण्यासाठी योजनेंतर्गत कर्ज मिळविण्याकरिता अर्ज दाखल करावा, असे सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Agriculture News । शेताच्या बांधावर कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या तज्ञांचं मत