Onion Rate । महाराष्ट्रातील लाखो कांदा उत्पादक शेतकर्यांवर कांदा कवडीमोल दरात (Onion Rate Falls Down) विकण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांना कांदा परवडत नसल्याने ते कांदा (Onion Price) शेतात फेकून देत आहे. यंदा पावसामुळे कांद्याची खूप नासाडी झाली आहे. असे असूनही कांद्याच्या दरात कोणताही बदल झाला नाही. अजूनही कांद्याचे दर (Onion) खूप पडले आहेत. अशातच आता कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे.
Expensive Tree । बापरे! तब्बल शंभर कोटींचं झाड, असते 24 तास सुरक्षा
‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर
मागील दोन महिन्यापासून कांद्याचे दर घसरले असताना सांगली जिल्ह्यातील वाई बाजारात समितीत (Wai Bazar Committee) कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. येथे कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांचा दर मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या बाजार समितीत केवळ 20 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. येथे कांद्याला कमाल 5000 ते किमान 2000 तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.
तसेच राज्यातील अनेक बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मागील आठवड्याच्या शेवटी कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील कराड बाजार समितीत कांद्याची 198 क्विंटल आवक झाली. येथे कांद्याला कमाल 5000 रुपये ते किमान 2000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर सातारा बाजार समितीत 117 क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याला कमाल 4500 रुपये ते किमान 2000 रुपये तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान
पुणे बाजार समितीत कांद्याची 8 हजार 109 क्विंटल आवक झाली. या बाजार समितीत कांद्याला कमाल 4600 ते किमान 2500 रुपये तर सरासरी 3550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तसेच पुण्यातील मोशी येथील बाजार समितीत कांद्याची 520 क्विंटल आवक झाली. कांद्याला या ठिकाणी कमाल 4000 ते किमान 1500 रुपये आणि सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कल्याण बाजार समितीत 3 क्विंटल कांद्याची आवक झाली, येथे कमाल 4500 ते किमान 4000 रुपये आणि सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
Onion Crop । कांद्यांने केला वांदा! रोपांची किंमत वाढल्याने शेतकरी हतबल
कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
दरम्यान, यावर्षी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांदा हे असे पीक आहे ज्याचे दर कधी कमी झालेले असतात तर कधी वाढलेले असतात. त्यामुळे शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतात. सध्या कांद्याची लागवड सुरु आहे. पण कांद्याच्या रोपांची टंचाई जाणवत आहे. कारण पावसामुळे रोपांची अपेक्षित लागवड होऊ शकली नाही.
Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान