Harbhara Bajar Bhav

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

बाजारभाव

Harbhara Bajar Bhav । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो. यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले आहे. याचा परिणाम सर्वच पिकांवर झाला आहे. त्यात खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. पिकांची नासाडी झाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आले आहेत.

Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या

दरम्यान, या आठवड्यात हरभरा बाजार (Gram market) कमालीचे पडले आहेत. देशातील प्रमुख हरभरा (Gram) उत्पादक राज्यातील बाजार समित्यांत 50 ते 150 रुपये प्रतिक्विंटल (Gram Price) आणि हरभरा डाळीच्या (Gram pulses) दरात 50 ते 100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरण (Gram Rate Falls Down) झाल्याचे पाहायला मिळत आहे. हरभरा दरात राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांत 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंतची घसरण (Gram Rate) झाली आहे.

Expensive Tree । बापरे! तब्बल शंभर कोटींचं झाड, असते 24 तास सुरक्षा

जाणून घ्या बाजार समितीतील दर

हरभऱ्याला सोलापूर बाजार समितीत कमाल 6350 ते किमान 5600 रुपये प्रति क्विंटल, जळगाव बाजार समितीत कमाल 6600 ते किमान 6300 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत कमाल 5800 ते किमान 5700 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत कमाल 6175 ते किमान 6125 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील उदगीर बाजार समितीत कमाल 5800 ते किमान 5700 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर बाजार समितीत कमाल 6500 ते किमान 6300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

Crop Insurance Scheme । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या अंतिम तारीख

या आठवड्यात मागणी घटल्याने हरभरा डाळीच्या दरात 50 ते 100 रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली आहे. दिल्लीत हरभरा डाळीला कमाल 7450 ते किमान 7175 रुपये प्रति क्विंटल, गुलबर्गा येथे बाजारात कमाल 7400 ते किमान 7200 रुपये प्रति क्विंटल, जळगाव आणि इंदोर येथील बाजारात संयुक्तपणे 7300 रुपये प्रति क्विंटल आणि कानपुर येथील बाजारात हरभरा डाळीला कमाल 7150 ते किमान 7000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान

जाणून घ्या प्रमुख राज्यांमधील बाजार

मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांत हरभरा दरात 50 ते 150 रुपये प्रतिक्विंटलपर्यंतची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मध्यप्रदेशातील इंदोर बाजार समितीत या आठवड्यात हरभऱ्याला कमाल 6200 ते किमान 6250 रुपये प्रतिक्विंटल, राजस्थानच्या जोधपूर बाजार समितीत कमाल 5700 ते किमान 4800 रुपये प्रति क्विंटल, जयपूर बाजार समितीत कमाल 6375 ते किमान 6325 रुपये प्रतिक्विंटल आणि बिकानेर बाजार समितीत 6150 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

Onion Crop । कांद्यांने केला वांदा! रोपांची किंमत वाढल्याने शेतकरी हतबल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *