Success Story

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

यशोगाथा

Success Story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. शेतीत कोण काय करू शकेल हे काही सांगता येत नाही. अनेक तरुण आता लाखो रुपयांची कमाई (Farmer Success Story) करत आहेत. शेती करताना योग्य नियोजन आणि मेहनत गरजेची असते. मेहनतीच्या जोरावर शेतकरी खूप कमाई करत आहेत.

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

आपल्या आवडीच्या क्षेत्रात संपूर्ण झोकून देऊन कष्ट केले तर यश हमखास मिळते. पुणे (Pune) जिल्ह्यातील ज्ञानेश्वर बोडके (Dnyaneshwar Bodke) यांनी देखील अपार कष्ट करत घवघवीत यश (Farmer Story) मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ऑफिस बॉय म्हणून काम केले आहे. शेती करून आज ते कोट्यवधी रुपये कमवत आहेत. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही. पैसे नसल्याने त्यांनी अनेक प्रकारची कामे केली.

Onion Rate । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर, जाणून घ्या

चांगले शिक्षण घेऊन काहीतरी करायची जिद्द त्यांच्या मनात होती, परंतु परिस्थितीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडून पुणे शहरात एका ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने ऑफिस बॉयची (Office Boy) नोकरी मिळाली. या कामातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ लागला. सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत काम असायचे. परंतु, या कामात ते खुश नव्हते.

Expensive Tree । बापरे! तब्बल शंभर कोटींचं झाड, असते 24 तास सुरक्षा

अशी मिळाली आयुष्याला कलाटणी

ऑफिस बॉयचे काम करत असताना एक दिवशी त्यांनी एका शेतकऱ्याची यशोगाथा वाचली. त्या शेतकऱ्याने 1000 चौरस फूट क्षेत्रामध्ये पॉलिहाऊसची शेती करत प्रत्येक महिन्याला 12 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे बातमी वाचताच त्यांनी लगेच नोकरी सोडली. पुण्यात जाऊन पॉलिहाऊस शेतीवर दोन दिवस कार्यशाळा केली. तरी त्यांना कसलीच माहिती मिळाली नाही.

Crop Insurance Scheme । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! फळपिकांचा विमा भरण्यास मुदतवाढ, जाणून घ्या अंतिम तारीख

त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यासोबत काम करून शिकायचे अशी इच्छा व्यक्त केली. पॉलीहाऊस शेतीचे ट्रेनिंग घेऊन बँकेकडून कर्ज घेऊन 1000 स्क्वेअर फुटात पॉलिहाऊस (Polyhouse) तयार केले. यात त्यांनी 1999 यावर्षी कारनेशन आणि गुलाब या फुलांची लागवड केली. मोठं-मोठ्या शहरांत ते उत्पादन पाठवू लागले. एकाच वर्षात त्यांनी बँकेचे दहा लाख रुपये कर्ज फेडून टाकले.

Agricultural Land Grant । भूमिहीन शेतमजुरांसाठी दिलासा! जमीन खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान

शेतकरी गटाची स्थापना

सध्याच्या घडीला ते देशी केळी, देशी पपई, संत्रा, आंबा, अंजीर आणि सीताफळासारखे सर्व हंगामी आणि बिगर हंगामी भाजीपाला आणि फळपिकांचे उत्पादन घेतात. त्यांनी दूध पुरवठा करण्याचे काम सुरू केले असून पिशवी बंद दूध ते लोकांच्या घरी पोहोचवतात. एप्लीकेशनच्या माध्यमातून सर्व काम चालते. ज्ञानेश्वर बोडके यांनी अभिनव फार्मिंग क्लब (Abhinav Farming Club) नावाचा एक शेतकरी गट स्थापन केला आहे.

Onion Crop । कांद्यांने केला वांदा! रोपांची किंमत वाढल्याने शेतकरी हतबल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *