Success Story

Success Story । दाम्पत्याने मारली नोकरीवर लाथ, अनोख्या पद्धतीने शेळीपालन करून वर्षाला होतेय लाखोंची कमाई

यशोगाथा

Success Story । हल्ली नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अनेकजण नोकरी सोडून व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अनेकजण शेतीपूरक व्यवसाय (Agribusiness) सुरु करतात. विशेष म्हणजे काही जण गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी देखील सोडत आहेत आणि व्यवसाय करत आहेत. अशाच एका दाम्पत्याने लाखोंची कमाई केली आहे.

Tur Market । तुरीला सध्या किती बाजारभाव मिळतोय? शेतकरी मित्रांनो वाचा एका क्लिकवर

नोकरी सोडून सुरु केला व्यवसाय

ओडीसा राज्यातील कालाहंडी जिल्ह्यातील महापात्रा या दांपत्यांने बेंगलोर या ठिकाणी असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेळीपालन व्यवसाय (Goat rearing business) सुरू केला आहे. जयंती आणि बिरेन महापात्रा असे या दांपत्यांचे नाव आहे. अनोख्या पद्धतीने शेळीपालन व्यवसाय सुरू करून या माध्यमातून ते लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. पण हजारो लोकांना रोजगार त्यांनी या व्यवसायाच्या (Goat rearing) माध्यमातून दिला आहे.

Dhananjay Munde । शेतकऱ्यांच्या खात्यात येणार तब्बल 23 कोटी 37 लाख रुपये, धनंजय मुंडेंनी दिली महत्त्वाची माहिती

रोजगार उपलब्ध करून दिला

दरम्यान, शेळीपालन व्यवसायाला सुरुवात करत असताना त्यांनी माणिकस्तू ऍग्रो या स्टार्टअप (Manikastu Agro Startup) अंतर्गत हा व्यवसाय सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी गावातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पण जवळपास 40 पेक्षा जास्त गावातील लोकांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Goat rearing income)

Success Story । काय सांगता! लसणाच्या शेतीतून शेतकरी बनला करोडपती, कसं केलं नियोजन

इतकेच नाही तर या दांपत्याने गोट बँकेची स्थापना करून सामुदायिक शेतीच्या माध्यमातून शेळीपालनाला प्रोत्साहन दिले आहे. त्यांची माणिकस्तू ऍग्रो ही सध्या महाराष्ट्रातील फलटण येथील राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेशी निगडित आहे. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्यांनी अनेक कृषी कंपन्या तसेच डेअरी आणि पोल्ट्री उद्योगांना भेटी दिल्या.

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

आज माणिकस्तू ऍग्रो फार्मशी 1000 शेतकरी जोडले गेलेले आहेत. या स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक वर्ष वयाच्या दोन मादी शेळ्या देण्यात येतात. या शेळ्या एका वर्षात कोकरांना जन्म देतात. ज्यावेळी ही शेळी व्यायते त्यावेळी ते शेतकरी 50% नवीन शेळ्या या गोट बँकेमध्ये परत करतात. या गोट बँकेमध्ये 40 पशुवैद्यक आहेत. त्यापैकी 27 स्थानिक महिला आणि तरुण आहेत. तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यांच्या गोट बँकेतील शेळ्यांची नियमित तपासणी आणि लसीकरण केले जाते.

Dairy Farming । आता म्हैसच सांगणार मी आजारी आहे, उद्या कमी दूध देईल; लवकरच येणार सेन्सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *