Agriculture Technologies

Agriculture News । गहू कापनीचे टेन्शन मिटले, बाजारात आले नवीन यंत्र, तासाभरात कापते अनेक बिघा गहू; जाणून घ्या किंमत?

तंत्रज्ञान

Agriculture News । महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतले जाते. गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी गव्हाची कापणी सुरू आहे. गव्हाची कापणी (Harvesting wheat) सुरू असताना शेतकऱ्यांना मजुरांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत असते. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी कायम हैराण असतात. वेळेवर मजूर मिळाले नाही तर गव्हाची कापणी लांबणीवर पडते. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमच मजुरांची चिंता भासते. मात्र आता बाजारात एक असे यंत्र आले आहे. ज्या यंत्राद्वारे तुम्ही गव्हाची सहज कापणी करू शकता.

Milk rate । दुध अनुदानाची संपली मुदत, आता होणार दुधात दरवाढ?

आज आम्ही तुम्हाला अशा हलक्या गहू कापणी यंत्राबद्दल सांगणार आहोत. रीपर असे या यंत्राचे नाव असुन हे यंत्र फक्त 30 मिनिटांत एक बिघा पीक काढू शकते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे काम लवकरात लवकर आणि खूप कमी किमतीमध्ये होणार आहे. मजुरांना पैसे देण्याचे टेन्शन आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना राहणार नाही. चला जाणून घेऊया या मशीनच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि किमती बद्दल.

Milk rate । दुध अनुदानाची संपली मुदत, आता होणार दुधात दरवाढ?

या यंत्राचा वापर राजस्थान या ठिकाणी केला जात असून त्या ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक बिघा पीक काढण्यासाठी 5 मजुरांना पूर्ण दिवस लागतो, मात्र या यंत्रामुळे 30 मिनिटांत एक बिघा पीक पूर्णपणे कापून वेगळे करते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचत आहे.

Onion Rate । निर्यातबंदी हटवताच कांद्याचे दर वाढले?, किती मिळत आहे प्रतिक्विंटल भाव? जाणून घ्या

किंमत आणि सबसिडी काय आहे?

या यंत्राची किंमत 80 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यावर कृषी विभाग अनुदानही देतो. पूर्व राजस्थानमधील कृषी अधिकाऱ्यांनी की, या ट्रॅक्टरवर चालणाऱ्या यंत्राच्या खरेदीवर कृषी विभागाकडून 50 ते 60 टक्के अनुदान दिले जाते. या यंत्राची सर्वात महत्त्वाची एक खासियत म्हणजे हे यंत्र आपोआप पिकांची कापणी आणि काढणी करू शकते.

Onion Rate । निर्यातबंदी हटवताच कांद्याचे दर वाढले?, किती मिळत आहे प्रतिक्विंटल भाव? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *