Sim Card

Sim Card । सावधान! तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? ‘या’ पद्धतीने जाणून घ्या नाहीतर..

तंत्रज्ञान

Sim Card । अलीकडच्या काळात स्मार्टफोनला (Smartphone) खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. स्मार्टफोन शिवाय अनेकांना तर एक मिनिटही चैन पडत नाही. स्मार्टफोनमुळे अनेक कामे चुटकीसरशी पूर्ण होतात. जवळपास प्रत्येकाच्या हातात तुम्ही स्मार्टफोन पाहत असाल. विशेष म्हणजे चिमुरड्यांकडेही स्मार्टफोन असतो. परंतु स्मार्टफोनसाठी सिमकार्ड खूप गरजेचे असते. सिमकार्डशिवाय स्मार्टफोनचा काहीच उपयोग नसतो.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’ चा लाभ

सध्या अनेक कंपन्यांची सिमकार्ड बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणतेही सिमकार्ड घेऊ शकता. अनेकजण कमी किमतीत जास्त फायदे देणारे सिमकार्ड वापरतात. परंतु सध्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात फ्रॉड कॉल्सचे प्रमाण खूप आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक (Sim Fraud) करणाऱ्यांचे सिमकार्ड स्वतःच्या नाही तर इतरांच्या नावावर असते.

Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प

फसवणूक करणारे लोक दुसऱ्याच्या नावावर सिमकार्ड घेऊन सर्वसामान्यांना तसेच सेलिब्रेटींना लाखोंचा गंडा घालतात. अशावेळी तुम्हाला तुमच्या नावावर किती जणांनी सिमकार्ड घेतले आहे, याची माहिती असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही कोठेही न जाता अगदी घरी बसून तुमच्या नावावर किती सिमकार्ड घेतले आहे ते जाणून घेऊ शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

Crop Insurance । 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर होणार कारवाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा इशारा

फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात अगोदर तुम्हाला sancharsaathi.gov.in या पोर्टलवर जावे लागेल.
  • त्यानंतर पोर्टलच्या होम पेजवर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला know Your Mobile Connection TAFCOP या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • पुढे tafcop च्या वेबसाईटवर Login करून तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या खाली दिलेला कॅपचा टाका. पुढे तुमच्या मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीवर Log In ऑप्शन वर क्लिक करा.
  • आता नेक्स्ट पेजवर तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत त्याची लिस्ट पाहता येईल. यात जे मोबाईल नंबर देण्यात आले आहेत ते पहिले चार आणि शेवटचे चार या पद्धतीने दर्शविले असतात. जर सर्व नंबर्स तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला काही करावे लागणार नाही.
  • समजा लिस्टमधील एखादा नंबर तुमचा नसल्यास तुम्ही तो रिपोर्ट करू शकता.
  • त्यासाठी सगळ्यात अगोदर त्या नंबरला सिलेक्ट करा. पुढे त्या नंबरच्या खाली Not My Number, Not Required आणि Required असे तीन पर्याय दिले असतात.
  • जो नंबर तुम्ही कधी पाहिला नसेल तर वर दिलेला एक पर्याय निवडून Report वर क्लिक करा.
  • तुमची रिक्वेस्ट स्वीकारली तर तुम्हाला वर मेसेज येइल. यात तुम्हाला रिपोर्ट नंबर किंवा Complaint Number किंवा Referense Number पण जनरेट होऊन दाखवण्यात येतो. हा नंबर तुम्हाला जतन करून ठेवा.
  • यानंतर ज्या कंपनीचे सिम आहे त्या कंपनीला फॉरवर्ड करून तो नंबर बंद केला जातो.

Havaman Andaj । राज्यभर पावसाची उघडीप, नागरिकांना सोसावे लागणार उन्हाचे चटके; वाचा हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *