Milk rate

Milk rate । दुध अनुदानाची संपली मुदत, आता होणार दुधात दरवाढ?

पशुसंवर्धन

Milk rate । राज्यातील पशुपालक यंदा चांगलाच हैराण झाला आहे. याला कारणही तसेच आहे. कारण यंदा दुधाचे दर (Rate of Milk) खूप कमी झाले आहेत. तसेच पशुखाद्य महाग झाले आहे. राज्याच्या अनेक भागात पाऊस (Rain in Maharashtra) पडला नाही. पाऊस नसल्याने पिके जळून गेली आहेत. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अनुदान (Milk subsidy) देण्याचा निर्णय घेतला.

Onion Rate । निर्यातबंदी हटवताच कांद्याचे दर वाढले?, किती मिळत आहे प्रतिक्विंटल भाव? जाणून घ्या

पण आता अनुदानाची देखील मुदत संपत आली आहे. दरम्यान, गाय दुधासाठी ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ साठी प्रतिलिटर २७ रुपये दर (Cow Milk Rate) देणे अनिवार्य केले. दुधासाठी पाच रुपये अनुदानाची घोषणा देखील करण्यात आली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील गाय दुधाचे दर ३० रुपयांवरून घसरले. दुधाच्या दराची घसरण होऊन दूध २७ रुपये झाले.

Onion Export Ban Lift । सरकारने उठवली व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी निर्यातबंदी, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

अनुदानाची संपली मुदत

धक्कादायक बाब म्हणजे अनुदानाची मुदत १० फेब्रुवारी रोजी संपली आहे. पण अजूनही अनुदानाचा पत्ता नाही. त्यामुळे अनुदानापूर्वीचा गाय दूध दर ३२ रुपये आता मिळणार का? असा प्रश्न दूध उत्पादकांना निर्माण झाला आहे. सरकारकडून ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी अशा ३० दिवसांसाठी गाय दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची घोषणा करण्यात आली होती.

Havaman Andaj । 7 राज्यांमध्ये अवकाळी आणि गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

महत्त्वाचे म्हणजे पाच रुपयांच्या अनुदानासाठी अतिशय किचकट कागदपत्रांची आवश्यकता होती. ऑनलाईन माहिती भरण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संकलन चालक यांची चांगलीच धावपळ उडाली. आधार कार्ड, बँक खाते सी लिंक करणे, दहा दिवसांची दुधाची सरासरी, जनावरांना टॅगिंग करणे, जनावरांच्या टॅगिंगवरून, शेतकऱ्यांचा फार्मर कोड आयडी तयार करून घेणे तसेच दूध उत्पादकांची माहिती ऑनलाइन भरणे यासह किचकट प्रक्रिया सरकारने केल्या.

Onion Export । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने हटवली कांदा निर्यात बंदी

होणार दुधात दरवाढ?

दरम्यान आता १० फेब्रुवारी रोजी अनुदानाची मुदत संपली आहे. तरीही अजून सरकारने दूध अनुदानाची मुदत वाढवून दिली नाही. त्यामुळे दूध दराचे संकट पुन्हा दूध उत्पादकासमोर उभे राहिले असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय पूर्वीप्रमाणे ३२ रुपये दर मिळणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Milk Rate । गायीच्या दुधाला ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ५५ रुपयांचा हमीभाव, कुठे झाली अंमलबजावणी जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *