Success Story

Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?

यशोगाथा

Success Story । अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काहीजण नोकरी नसल्याने टोकाचा निर्णय घेत आहेत. पण काही तरुण असे आहेत जे या समस्येवर मात करत स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच एका बेरोजगार तरुणाने कुक्कुटपालनाचा यशस्वी व्यवसाय (Poultry business) करून दाखवला आहे.

Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक

कुक्कुटपालन व्यवसाय

विशेष म्हणजे त्याच्याकडे ना शेती, ना शिक्षण. तरीही त्याने यशस्वी व्यवसाय करून दाखवला आहे. नवनाथ वळसे (Navnath Walse) असे या तरुणाचे नाव आहे. ते तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील रहिवासी आहे. त्यांनी गवळेवाडी येथील शिवारात माळरानावर अवघ्या १० गुंठे जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यात पत्र्याचे शेड उभे केले. यामध्ये त्यांनी गावरान कोंबडीची पिले संगोपन (Poultry) करण्याचे ठरवले.

Amol Kolhe । सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरून अमोल कोल्हे संतप्त, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर केले गंभीर आरोप

लाखोंची होते उलाढाल

या शेडमधून ते गावरान अंडी उबवून त्यातून पिल्लांची निर्मिती करतात. या व्यवसायासाठी (Poultry farming) त्यांनी इलेक्ट्रिक मशीनसह एकूण दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली असून पिल्लाचे संगोपन करून ते मोठे झाल्यानंतर ही गावरान कोंबडी ४५० तर कोंबडा ६०० रुपये दराने विक्री करतात. आनंदाची बाब म्हणजे या व्यवसायातून (Poultry farming business) वर्षाकाठी ७ लाख रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होते.

Animal Husbandry Business । जनावरे माती का खातात? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपाय

खर्च जाता वर्षाकाठी साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांना मिळतो. अगदी कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळत असल्याने वळसे यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांच्याकडे कोणतीही नोकरी नसल्याने हा व्यवसायच आता त्यांचा आर्थिक आधार बनला आहे. अंडी उबविण्यासाठी त्यांनी आधुनिक इलेक्ट्रिक मशीन विकत घेतली आहे.

Government Schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना

या मशीनमधून एकाच वेळी ४०० गावरान अंड्यांची उबवणूक होऊन अंडी २१ दिवस मशीनमध्ये ठेवल्यास अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. ही पिल्ले मोठी झाल्यानंतर गावरान कोंबडीला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. इतकेच नाही तर गावरान कोंबडीला मागणी चांगली असल्याने तिला भावही योग्य मिळत आहे.

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *