Poultry Farming । भारतात मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry business) चांगलीच मागणी आहे. विविध भागात आज कुक्कुटपालन व्यवसाय केला जातो. आपल्याला कोंबड्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. या प्रजातींनुसार कोंबड्यांच्या किमती (Chicken prices) ठरत असतात. किंमत कितीही असली तरी खवय्ये ते खरेदी करतात.
डॉन्ग टाओ
अशीच एक कोंबड्याची प्रजाती आहे जिची किंमत एक लाखापेक्षा जास्त आहे. हा जगातील सर्वात महागडा कोंबडा (Most Expensive Chicken) मानला जातो. ‘डॉन्ग टाओ’ (Dong Tao) असे या कोंबड्याचे नाव आहे. व्हिएतनाम या देशामध्ये या कोंबड्याच्या प्रजातीचे (Chicken species) पालन केले जाते. तसेच हा कोंबडा ‘ड्रॅगन चिकन’ (Dragon Chicken) या नावाने देखील ओळखला जातो. सर्वात अगोदर व्हिएतनामची (Vietnam) राजधानी हनोई या ठिकाणी त्याचे पालन करण्यास सुरुवात झाली.
Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक
या कोंबड्याची मागणी वाढू लागल्याने अनेक देशांमध्ये पोल्ट्री व्यावसायिक ‘डॉन्ग टाओ’चे पालन करत आहे. भारतात सध्या तरी या कोंबड्याचे पालन केले जात नाही. कारण येथील लोकांना याची माहिती नाही, त्यामुळे त्याचे भारतात पालन केले जात नाही. या कोंबड्याचे पाय हे सामान्य कोंबड्यापेक्षा खूप जाड असून त्यांचा रंग लाल असतो.
किती आहे किंमत?
किमतीचा विचार केला तर या कोंबड्याची किंमत 1,65,000 रुपये इतकी आहे. व्हिएतनाममध्ये या कोंबड्यांची संख्या खूपच कमी आहे. असे असले तरीही त्या ठिकाणी ‘लूनर न्यू ईयर’ या मुख्य सणाला ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याच्या चिकनला सर्वात जास्त मागणी असते. विशेष म्हणजे महागडे चिकन असूनही, ग्राहक त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.
Animal Husbandry Business । जनावरे माती का खातात? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपाय
या कोंबड्याला सामान्य कोंबड्यांपेक्षा जास्त खाद्य लागते. त्याचे वजन 10 किलोपर्यंत असते. त्याच्या चिकनमध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असल्याने तो आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. इतर कोंबड्यांच्या तुलनेत ‘डॉन्ग टाओ’ कोंबड्याच्या मांसामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असून ज्यांना प्रथिनांचे सेवन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
Government Schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना