Success Story

Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला यशस्वी ‘बनाना चिप्स’ उद्योजक

यशोगाथा

Success Story । हल्ली युवावर्ग आधुनिक शेती (Modern agriculture) करू लागला आहे. यातून त्यांना पारंपरिक शेतीपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे काही तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. अशाच एका २८ वर्षीय तरुणाने ‘बनाना चिप्स’ निर्मिती उद्योग (Banana chips manufacturing industry) सुरू केला आहे.

Amol Kolhe । सरकारच्या शेतीविरोधी धोरणावरून अमोल कोल्हे संतप्त, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर केले गंभीर आरोप

अशी केली सुरुवात

उमेश मुके (Umesh Muke) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. ते हिंगोली जिल्ह्यातील खाजमापूरवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे. त्यात ते केळी आणि हळदीची लागवड (Cultivation of Turmeric) करतात. पण त्यांना सतत केळीच्या पिकातून आर्थिक फटका सहन करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी केळीचे मूल्यवर्धन म्हणजेच प्रक्रिया करण्याचे ठरविले. (Banana chips)

Animal Husbandry Business । जनावरे माती का खातात? जाणून घ्या यामागचं कारण आणि उपाय

आपणही उद्योजक व्हावे त्यांना पूर्वीपासून वाटायचे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्वी मोबाइल उद्योग, ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देणे असे व्यवसाय केले पण त्यात त्यांना यश आले नाही. उमेश यांनी सन २०१८ मध्ये आई अन्नपूर्णा यांच्या मदतीने घरच्या केळीपासून घरगुती पद्धतीने चिप्स (Banana chips making) तयार करायला सुरुवात केली. त्याची त्यांनी गिरगाव येथील किराणा दुकानाद्वारे विक्री केली.

Government Schemes । महिलांनो, उद्योजक बनायचंय? आता सरकारच करतंय मदत, जाणून घ्या योजना

त्यांना यश मिळत गेले. ग्राहकांना त्यांनी तयार केलेले बनाना चिप्स आवडू लागले आणि काही काळातच त्याची मागणीदेखील वाढली. मागणी वाढल्याने उमेश यांचा उत्साह देखील वाढला. त्यामुळे त्यांनी उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेतला. ते दररोज ५ ते १० किलो चिप्स तयार करू लागले. दुचाकीवरून माल घेऊन परिसरातील गावांमध्ये स्वतः विक्री करत होते.

Melon Cultivation । शेतकरी बांधवांनो, खरबुजाची लागवड करून तीन महिन्यात मिळवा लाखो रुपये

२० लाखांपर्यंत पोहोचली उलाढाल

त्यांनी सन २०२० मध्ये विक्रीकर विभागाकडे सिद्ध अन्नपूर्णा फूड्स नावाने उद्योगाची नोंदणी करून सन २०२१ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेतला. व्यवसायासाठी त्यांनी तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्राकडून अन्नप्रक्रिया प्रशिक्षण देखील घेतले. दरम्यान, सुरुवातीच्या काळात पाच लाखांच्या आसपास असणारी उलाढाल आज २० लाखांपर्यंत पोहोचली आहे. यातून त्यांना २० टक्के नफा मिळत आहे. घरच्या केळींचे मूल्य वाढले असून घरच्या शेतीत ग्रॅंड नैन जातीच्या केळीची मृग बाग आणि कांदे बाग लागवड असते.

Jayakwadi Dam । शेतकऱ्यांना मोठा फटका! पिकांसाठी जायकवाडीतून पाणी नाही

इतकेच नाही तर त्यांच्या कच्च्या मालाची खरेदी देखील शेतकऱ्यांकडून होते. प्रति क्विंटल केळीपासून २० किलो चिप्स मिळत असून ३० ग्रॅम पाऊच पॅकिंग आहे. त्याची १० रुपये किंमत आहे. १०० ग्रॅम, २०० ग्रॅम व १ किलो पॅकिंग केले जाते. सुरुवातीला परिसरातील गावांमध्ये असणारे मार्केट आता परभणी, नांदेड, छत्रपती संभाजी नगर येथील घाऊक व्यापाऱ्यांपर्यंत विस्तारले आहे.

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! 2 एकरातून मिळवलं तब्बल 75 लाखांचं उत्पन्न, जाणून घ्या यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *