Inflation

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

बाजारभाव

Inflation । देशात दिवसेंदिवस महागाई (Inflation in India) वाढत चालली आहे. महागाईने सर्वसामान्यांना कोणतीही वस्तू पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन खरेदी करावी लागत आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या बजेटवर (Budget) होत आहे. महागाई वाढत (Inflation rising) चालल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडून गेले आहे. यंदा पाऊस (Rain in Maharashtra) नसल्याने बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर (Vegetable rates) वाढले आहेत.

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

डाळींच्या दरात वाढ

अशातच आता डाळींचे देखील दर (Pulse rates) वाढले आहेत. डाळींच्या दरात प्रति किलो मागे वीस रुपयांपर्यंतची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दर गगनाला (Pulse rates hike) भिडले आहेत. साहजिकच दर वाढल्याने ग्राहक डाळींकडे पाठ फिरवू लागले आहेत. किमती वाढल्याने डाळीच्या विक्रीमध्ये (Sale of pulses) घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

Havaman Andaj । चक्रीवादळामुळे शेतकरी अडचणीत! ‘या’ ठिकाणी पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. किरकोळ बाजारात कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीनं पुन्हा भरारी घेतली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर प्रति किलो पन्नास ते साठ रुपये असून टोमॅटोचे दर प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये इतके आहेत. तसेच इतर भाज्यांच्या दरात देखील कमालीची वाढ झाली आहे. डाळ, भाज्या या सर्वांचे दर कडाडले आहेत.

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

ग्राहकांना मोठा फटका

दरम्यान, महागाईचा सर्वात मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. घाऊक बाजारात महागाई वाढल्याने त्याचा परिणाम किरकोळ विक्री बाजारपेठेवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय, पेट्रोल, डिझेलचे दर देखील गगनाला भिडले आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन ती वस्तू खरेदी करावी लागत आहे. अनेकजण तर त्या वस्तूला पर्याय देखील शोधत आहे.

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *