Brinjal Rate

Brinjal Rate । वांग्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

बाजारभाव

Brinjal Rate । यंदा परतीच्या पावसाचा (Rain in Maharashtra) शेतीवर खूप मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही शेतात पाणीच-पाणी आहे. पाण्यामुळे अनेक भागात शेतात जाणे कठीण झाले आहे. याचा फटका भाजीपाल्यांना (Vegetables) झाला आहे. त्याशिवाय आवक देखील मर्यादीत आहे. या कारणास्तव मागील दोन आठवड्यापासून भाजीपाला दरात (Vegetables price) कमालीची वाढ झाली आहे.

Electric Bike । भारीच की राव! मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमतही आहे खूपच कमी

किती मिळत आहेत दर? पहा

आज सोलापूर बाजार समितीत वांग्याला प्रति क्विंटल 10 हजार रुपये (100 रुपये प्रति किलो) मिळत (Brinjal price hike) आहे. तसेच जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीत विक्रमी 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. आज सोलापूर बाजार समितीत 27 क्विंटल वांग्याची आवक झाली असून त्याला कमाल 10 हजार ते 1000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

Milk Subsidy । दूध दराबाबत राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

तसेच मंगळवेढा बाजार समितीत वांग्याची 36 क्विंटल आवक झाली आहे. येथे वांग्याला कमाल 12 हजार ते 2900 तर सरासर 6800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकलूज बाजार समिती वांग्याला कमाल हजार ते 3000 तर सरासरी 5500 रुप प्रति क्विंटल दर मिळत आहे. दरम्यान, आज चंपाषष्टी आहे, या निमित्ताने खंडोबाची पूजा करण्यात येते. देवाला नैवैद्य प्रसादाचा भाग म्हणून, वांग्याचा समावेश करतात. त्यामुळे वांग्याला जास्त मागणी आहे.

Eknath Shinde । कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

इतर बाजार समितीतील दर

आज कोल्हापूर बाजार समितीत वांग्याची 82 क्विंटल आवक झाली आहे. येथे वांग्याला कमाल 7 हजार ते 2500 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. नाशिक बाजार समितीत वांग्याची 135 क्विंटल आवक झाली आहे. येथे वांग्याला 8 हजार ते 3000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तसेच पुणे-पिंपरी बाजार समितीत आज वांग्याची 3 क्विंटल आवक झाली आहे. येथे 7 हजार ते 3000 तर सरासरी प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये वांग्याचे दर वाढले आहेत. मागणी जास्त असल्यामुळे 50 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या वांग्यांला चंपाषष्टीमुळे 80 ते 120 रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. परंतु, याचा ग्राहकांना फटका सहन करावा लागत आहे.

Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *