Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

हवामान

Havaman Andaj । गेल्या काही दिवसांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अशी आहे की, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, उत्तर-पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, उत्तर झारखंड आणि पश्चिम बिहारमध्ये दाट धुके दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपसह इतर अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (IMD Rain Alert)

Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

स्कायमेट वेदरनुसार, पुढील २४ तासांत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विविध राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे. त्याचबरोबर २४ तासांच्या पावसामुळे मैदानी भागात थंडी आणखी वाढू शकते, असाही अंदाज आहे. यासह, उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये किमान तापमानात किंचित घट होईल.

Onion Rate | दहा दिवसांत कांद्याच्या दरात सर्वाधिक घसरण, पाहा बाजारातील परिस्थिती

देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा, चंदिगड-दिल्ली, उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग आणि उत्तर-पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य भागात किमान तापमान 5-10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिमच्या अनेक भागात किमान तापमानात सुमारे २ अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे.

Rabi Sowing । ज्वारीच्या क्षेत्रात वाढ! गहू, मका आणि हरभऱ्याचे क्षेत्र घटले

या ठिकाणी दाट धुक्याची शक्यता

आयएमडीच्या अहवालानुसार, पुढील 5 दिवसांत हरियाणा, आसाम आणि मेघालयच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि पंजाबमधील लोकांना पुढील पाच दिवस दाट धुक्यासह थंडीच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

Government Schemes । पशुपालकांसाठी शेवटची संधी! 75 टक्के अनुदानावर घेता येणार विविध योजनांचा लाभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *