Government Schemes

Government Schemes । पशुपालकांसाठी शेवटची संधी! 75 टक्के अनुदानावर घेता येणार विविध योजनांचा लाभ

शासकीय योजना

Government Schemes । शेतीसोबत अनेकजण शेतीपूरक व्यवसाय (Agribusiness) सुरु करतात. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई करता येते. परंतु अनेकांकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसतात. याचा विचार करता सरकार विविध योजना (Agribusiness Schemes) राबवत असते. ज्याचा लाभ देशभरातील लाखो लोक घेत आहेत. पशुपालकांसाठी कृषी पशु संवर्धक विभागाकडून (Department of Agriculture Animal Breeding) विविध योजना राबवल्या जात आहेत.

Milk Subsidy । लिटरमागे दुधाला ५ रुपये अनुदान द्या, दूध उत्पादकांची सरकारकडे मागणी

याला राजस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्वरूप आहे. खरतर नाशिक (Nashik) पशुसवंर्धन विभाग जिल्हापरिषद व राज्यशासनामार्फत पशुपालकांना अनु. जातीसाठी अनु. जमाती साठी आणि सर्वसाधारण पशुपालकांना 15 डिसेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होते. परंतु आता मुदतीत वाढ करण्यात आली आहे. पशुपालकांना आता 18 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील.

Electric Bull । काय सांगता? ‘हा’ इलेक्ट्रिक बैल ठरतोय शेतकऱ्यांसाठी वरदान

आज शेवटची संधी

15 डिसेंबरपर्यंत जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत योजनांचे समाधानकारक अर्ज प्राप्त झाले नव्हते. अर्ज करण्यासाठी आजची शेवटची मुदत आहे. त्यामुळे तातडीने अर्ज भरुन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. अर्जासाठी तुम्हाला https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर भेट देता येईल. तर मोबाईल व्दारे AIH.MAHABMS या अँपवर जाऊन अर्ज करता येईल.

Nursery Subsidy । शेतकऱ्यांनो, सोडू नका अशी संधी! ‘या’ सोप्या पद्धतीने आजच मिळवा नर्सरी अनुदान, जाणून घ्या अर्जपद्धती

या आहेत योजना

10+1 शेळीगट ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी असून अनुदानाची टक्केवारी 75 टक्के आहे. म्हणजेच 25 टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागेल. लाभधारक बीपीएल, बचत गट, अल्प भूधारक असावा. त्याला तीन अपत्ये नसावी, नाव यादीत असून लाभ मिळाला नाही, अशा लाभधारकांना प्रतीक्षा यादीत ठेऊन पुढील वर्षी लाभासाठी प्राधान्य देण्यात येईल.

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

दुधाळ जनावरांचा गट ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी असून यात 75 टक्के अनुदान सरकार देईल. 25 टक्के अनुदान लाभार्थ्याला भरावे लागेल. यात गायगटासाठी 1 लाख 17 हजार 638 रुपये, म्हैसगटासाठी 1 लाख 34 हजार 443 रुपये रक्कम मिळेल. 100 एकदिवसीय कुक्कुट गट वाटप योजना सर्व प्रवर्गासाठी असून यासाठी 50 टक्के अनुदान मिळेल.

Success Story । पोलिसाचा नादच खुळा! नोकरीला लाथ मारली अन् चक्क सुरू केली पांढऱ्या चंदनाची शेती

50 टक्के अनुदान लाभार्थ्याला भरावी लागेल. तसेच 25+3 तलंगा गट वाटप योजनेसाठी 50 टक्के अनुदान आहे. या सर्व योजनासाठी जातीचा दाखला, रेशन कार्ड, फोटो, आधार कार्ड,जनावरांना जागा उपलब्ध असावी आणि जर स्वतःची जागा असेल तर नमुना नंबर 8 गरजेचा आहे.

Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या वेळी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *