Care of Calves

Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या वेळी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

पशुसंवर्धन

Care of Calves । वासराचा जन्म होताच सर्वप्रथम त्याचा श्वासोच्छवास चालू असल्याची खात्री करावी, नंतर त्याचे नाक, तोंड स्वच्छ करावे. नवजात वासराला उलटे करून उंच धरावे आणि नाक व तोंडातील चिकट द्राव काढून टाकवा. गाय वासराला चाटू लागते, त्यामुळे वासराची रक्ताभिसरणाची क्रिया सुरू होते. गायीला वासराला चाटू द्यावे, त्यामुळे जार पडण्यास मदतच होते. पण तसे न झाल्यास वासरू खरखरीत कापडाने पुसून घ्यावे. (Care of Calves)

Success Story । नादच खुळा! मत्स्यपालन करण्यासाठी इंजिनिअरची नोकरी सोडली, आता वार्षिक 40 लाखांपर्यंत नफा, वाचा यशोगाथा

गाय विताच वासराची नाळ न तुटल्यास, ती उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापून घ्यावी. नाळ बेंबीपासून दोन इंच अंतरावर कापून शरीरालगतची नाळ तीव्र टिंक्चर आयोडिनमध्ये बुडवून स्वच्छ धाग्याने बांधून टाकावी. जन्मजात दोष किंवा जखम असल्यास नोंद घ्यावी. (काही कालवडींमध्ये सडांची संख्या अधिक असू शकते.) मोठा कळप असल्यास कालवडीच्या कानात टॅग लावावा.

Duck Farming । अशा प्रकारे बदक पालन सुरू करा, दुप्पट नफा मिळेल, जाणून घ्या सविस्तर माहिती

चीक पाजणे :

चीकातील नैसर्गिक इम्युनोग्लोबुलिन्सच्या गुणधर्मामुळे कालवडीत रोगप्रतिकारशक्ती तयार होते. चीकात नेहमीच्या दूधापेक्षा दुप्पट घन पदार्थ व चारपट प्रथिने असतात. चीकात क्षार, खनिजे व पोटाची वाढ करणारे घटक भरपूर प्रमाणात असतात.

चीकाचे जास्तीत जास्त पचन पहिल्या ३० तासातच होते. म्हणून पहिल्या दिवशी वासराला भरपूर चीक पाजावा. स्वेच्छेने पिईल तितका पाजावा. पहिल्या १ तासात १ ते १.५ लिटर व नंतर ४ ते ६ तासांनी परत १ ते १.५ लिटर असे पाजत रहावे. पहिल्या २४ तासात कमीत कमी ४.५ लिटर किलो चीक मिळावा.

चीक (साठविलेला असल्यास) खाऊ घालताना, त्याचे तापमान शारिरीक तापमानाएवढे (३७ से.) असावे. अडीच महिन्यांनंतरच हिरवा व सुका चारा हळूहळू द्यावा. तीन महिन्यांनंतर मोठ्या जनावरांचे उत्तम पशुखाद्य देण्यास हरकत नाही. नंतर वासराची गरज २ ते २.५% शुष्क खाद्याची असते.

Dairy Farming Tips । मुऱ्हा म्हैस पशुपालकांसाठी ठरते वरदान, सरकार तिच्या खरेदीवर देतंय 50% अनुदान

शिंगे जाळून टाकणे :

वासराच्या वयाच्या १५ दिवसांच्या आत शिंगांचे कोंब जाळून घ्यावेत. त्यासाठी आपल्या प्रचलित पध्दतीत मोठ्या डोक्याचा सुतारी खिळा, व्हॅसलिन, पक्कड व कात्री वापरले जातात. तसेच कॉस्टिकच्या कांडीने वा वीजेवर चालणाऱ्या शिंगे काढण्याच्या यंत्राचाही वापर करता येतो. शिंगाजवळच्या भागातील केस कात्रीने कापून घ्यावेत. कोंबाच्या सभोवताली अर्धा इंच भागाबाहेर व्हॅसलिन लावावे. खिळ्याचा ठोंब चांगला गरम करून शिंगाच्या कोंबावर दाबावा, किंवा कॉस्टिकची कांडी कोंबावर घासावी. बोटाच्या स्पर्शाने कोंब पूर्णपणे जळाला आहे, याची खात्री करून घ्यावी व नंतर त्यावर बोरिक पावडर, झिंक ऑक्साईड व मोरचूद मिश्रण लावावे. जखम सुकून खपली पडे पर्यंत योग्य काळजी घ्यावी. गरज पडल्यास मलमही लावावे.

Havaman Andaj । सावधान! पुढील ४८ तासांत गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *