Agricultural Laws । जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतात. शक्य असेल तेथून पाईप लाईन टाकून जमीन बागायत करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. पाईपलाईनमुळे आता लांबच्या ठिकाणावरून पाणी आणणे शक्य झाले आहे. अशा वेळी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन आणावी लागते व त्यामुळेदेखील – शेतकऱ्यांमध्ये वाद होतांना आपण पाहतो.
पूर्वीच्या काळी बहुसंख्य शेतकऱ्यांचे पाण्याचे पाट हे विहीरीपासून प्रत्यक्ष शेतापर्यंत, मुख्यतः स्वतःच्या शेतातून जात असत. पाणी पुरवठ्याच्या मर्यादित साधनांमुळे, पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे व शेतजमीनीचे तुकडे झाल्यामुळे आता दुसऱ्याच्या शेतातून देखील पाण्याचे पाट काढावे लागतात. या संदर्भात जमीन महसूल कायद्यात असलेल्या तरतुदीचा आपण अभ्यास करणार आहोत.
Duck Farming । अशा प्रकारे बदक पालन सुरू करा, दुप्पट नफा मिळेल, जाणून घ्या सविस्तर माहिती
जर शेतकऱ्यांमध्ये सामंजस्य असेल आणि पाट काढण्यास किंवा पाईपलाईन काढण्यास कोणाचीही हरकत नसेल तर वाद निर्माण होत नाहीत व अशा प्रकरणी कोणत्याही परवानगीचा देखील प्रश्न उद्भवत नाही. तथापी दुसरा शेतकरी पाण्याचा पाट काढू देत नसेल किंवा पाईपलाईन जाऊ देत नसेल तर वाद निर्माण होऊ शकतो.
Dairy Farming Tips । मुऱ्हा म्हैस पशुपालकांसाठी ठरते वरदान, सरकार तिच्या खरेदीवर देतंय 50% अनुदान
कायदेशीर तरतूद :
या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल कायाद्याअंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम १९६७ हे बनविण्यांत आले आहेत. या नियमानुसार ज्या शेतकऱ्याला दुसऱ्याच्या जमीनीतून जाणारे आपल्या शेतापर्यंतचे पाट बांधण्याची इच्छा असेल त्याने विहीत नमुन्यामध्ये तहसिलदाराकडे अजे केला पाहिजे. असा अर्ज मिळाल्यानंतर तहसिलदार सर्व संबंधितांना नोटीस काढून त्यांना आपले म्हणणे मांडण्याचं संधी देतात. कोणत्या मुद्यावर शेजारच्या शेतकऱ्याची हरकत आहे हे तपासले जाते व गरज विचारात घेऊन अर्जदाराला पाण्याचे पाट बांधण्याची परवानगी दिली जाते. अशी परवानगी देतांना तहसिलदाराकडून खालील महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जातात.
Havaman Andaj । सावधान! पुढील ४८ तासांत गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता
१) शक्यतो परस्परांना संमत होईल अशा दिशेने पाट काढण्यास परवानगी दिली जाते.
२) एकवाक्यता न झाल्यास शेजारच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीने पाट काढण्यास परवानगी दिली जाते.
३) असे पाट किंवा पाईपलाईन ही जवळच्या अंतराने टाकली गेली पाहिजे.
४) पाट काढतांना किंवा पाईपलाईन टाकतांना दुसऱ्या शेतकऱ्याचे जाणीवपुर्वक नुकसान केले जात नाही ना याची खात्री केली जाते.
५) पाण्याच्या पाटाची रूंदी ही किमान आवश्यक एवढीच असेल व कोणत्याही बाबतीत दीड मीटरपेक्षा जास्त असू नये.
६) पाईप किमान अर्ध्या जास्त खोलीवर टाकली गेली पाहिजे.
७) जमीनीवरून करण्यात येणारे पाण्याचे पाट व जमीनीवरून जर पाईपलाईन टाकण्यात आली तर शेजारच्या शेतकऱ्यास वाजवी म्हणून ठरविण्यात येईल ते भाडे दिले जाते.
पाईपलाईन टाकतांना तसेच तिची दुरुस्ती करतांना कमीत कमी जमीन खोदली जाईल व खोदलेली जमीन अर्जदाराने पुन्हा स्वखर्चाने पुर्ववत केली पाहिजे.
९) उभी पिके असतील तर त्यांना कमीतकमी नुकसान पोहोचेल याची दक्षता घेतली जाते. एवढे करूनही नुकसान झाल्यास तिची नुकसान भरपाई अर्जदाराने देणे अपेक्षित आहे.
१०) अशी नुकसान भरपाई देण्यात जर कसू करण्यात आली तर ती जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करता येईल.
Jowar Bajar Bhav । गगनाला भिडले ज्वारीचे दर, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या
अपील :
पाईपलाईनबाबत किंवा पाण्याच्या पाटाबाबत तहसिलदारानी दिलेल्या आदेशाविरूद्ध अपील करता येत नाही. लहान लहान वाद हे स्थानिक पातळीवर सुटावेत व अपीलाच्या द्वारे संबंधिताला पाईपलाईनसारखी महत्त्वाची बाब लांबविण्याची संधी मिळू नये हा यामागील उद्देश आहे. तथापी अन्यायाने आपल्यावर आदेश बजावण्यांत आले आहेत असे वाटल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येईल व जिल्हाधिकारी अशा प्रकरणाची कागदपत्रे मागवून व सुनावणी घेऊन योग्य ते आदेश काढू शकतील.
अर्जाचा नमुना :
शेतकऱ्याने खालील विहीत नमुन्यात तहसिलदाराकडे अर्ज केला पाहिजे व अर्जासोबत पाईपलाईनचा नकाशा व ७/१२चा उतारा जोडला पाहिजे.