Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! पुढील ४८ तासांत गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान

Havaman Andaj । राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. ही थंडी काही पिकांसाठी खूप फायदेशीर आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेशासह इतर राज्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्राच्या (IMD Update) काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Jowar Bajar Bhav । गगनाला भिडले ज्वारीचे दर, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, केरळमध्ये पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये १५ ते १७ डिसेंबर, केरळ आणि माहेमध्ये १६ ते १८ डिसेंबर, लक्षद्वीपमध्ये १७ आणि १८ डिसेंबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडेल. (IMD Alert)

Organic Farming । सेंद्रिय शेतीसाठी सरकार देतंय 70 हजार ते 25 लाखापर्यंत अनुदान! त्वरित घ्या लाभ

गारपीटीचा अंदाज

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाजही वर्तवला आहे. तसेच येत्या ४८ तासांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर उरलेल्या भागात ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी थंडी वाढेल. दरम्यान, देशभरात थंडीचा प्रभाव दिसायला लागला आहे. मिचाँग चक्रीवादाळाचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे.

Success Story । शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीतून कमावतोय लाखो रुपये, असं केलं नियोजन

यावर्षी पावसामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. रब्बी हंगामात पावसाने काही भागात पाठ फिरवली तर काही भागात खरीप हंगामात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक भरपाईची वाट पाहत आहेत. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Land Rights । कामाची बातमी! बांधावरील जमिनीच्या वादावर निघाला मार्ग, मोजणीसाठी ‘हे’ यंत्र ठरतेय फायदेशीर

दरम्यान, दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले आहे. व्यथा मांडतांना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. दुष्काळी परिस्थितीची दाहकता आणि त्यामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान याची दखल घेत सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *