Havaman adnaj

Havaman adnaj । शेतकऱ्यांनो सावधान! पुढचे ३ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

हवामान

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे.

Success Story । इंजिनीअरिंगच्या नोकरीला ठोकला रामराम! टोमॅटोच्या शेतीतून ‘हा’ पठ्ठया मिळवतोय लाखोंचा नफा

पिकांची घ्या काळजी

अशातच आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने (IMD Alert) देशासह राज्यातील काही भागात शनिवारी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Weather Forecast) याशिवाय तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होईल, असेही हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे.

Maize Crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या

आजपासून आगामी दोन ते तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान मध्य भारतासह पूर्व भारतातील तापमानात वाढ होईल. ढगाळ वातावरण निर्माण तयार झाले असल्याने काही भागात अवकाळी पाऊस पडेल.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

या ठिकाणी पडणार पाऊस

आजपासून दोन ते तीन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लादेखील हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिला आहे.

Devendra Fadnavis । मोठी बातमी! कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. जर आता अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झाली तर शेतकऱ्यांना आणखी मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Agriculture Minister Arjun Munda । शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली सर्वात मोठी घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *