Maize crop

Maize crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या

बातम्या

Maize crop । मका (Maize) हे भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणात घेण्यात (Production of Maize) येते. कमी वेळेत जास्त हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून मका या पिकाची ओळख आहे. या पिकाच्या अनेक जाती आहेत, तुम्ही कोणत्याही जातीची लागवड (Cultivation of Maize) करू शकता.

Havaman Andaj । राज्यातून थंडी गायब! ‘या’ ठिकाणी कोसळणार धो धो पाऊस, जाणून घ्या

काळ्या रंगाची मका

तुम्ही आजपर्यंत पांढरा आणि पिवळ्या रंगाची मका पाहिली असेल पण कधी काळ्या रंगाची मका (Black Maize) पाहिली आहे का? या मक्याला बाजार दरापेक्षा कित्येक पटीने जास्त मिळतो. ही मका दुर्मिळ (Black Maize Cultivation) आहे. तिची सध्या बाजारात ३०० रूपये किलोप्रमाणे (Black Maize Rate) विक्री होत आहे. जर तुम्हाला मका या पिकातून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही काळ्या मक्याची लागवड करू शकता.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

जाणून घ्या वैशिष्ट्ये

तुम्ही या मक्याचे वाणाचे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूत उत्पादन घेऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसात तर या वाणाच्या मक्याच्या एका ताटाला तीन ते पाच कणीस आणि उन्हाळ्याच्या दिवसात या वाणाच्या मक्याच्या एका ताटाला २ ते ३ कणीस लागतात. इतकेच नाही तर या ताटाची उंचीदेखील चांगली होते. असे असल्याने मुरघास बनवायचा असेल तर हा वाण चांगला ठरतो.

Devendra Fadnavis । मोठी बातमी! कमी किमतीत कापूस खरेदी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

हे लक्षात घ्या की, काळ्या रंगाच्या मक्याचे बियाणे सध्या बाजारात सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक शेतकरी ही मका लावत नाहीत. पण हे देशी बियाणे आहे, त्यामुळे हे देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे हे बियाणे सहज उपलब्ध होऊ शकते. जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही याची लागवड करू शकता.

Agriculture Minister Arjun Munda । शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी केली सर्वात मोठी घोषणा

जाऊन घ्या फायदे

यात लोह आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने या मक्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या मक्यापासून लाह्या आणि भाकरी तयार करता येतात. ही मका स्नायूंसाठी चांगली असून अवजड काम केल्यानंतर या मक्याचे सेवन फायदेशीर ठरते. काळ्या मक्याच्या सेवन केले तर रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Black Soybean । शेतकऱ्यांनो, जास्त नफा मिळवायचा असेल तर करा काळ्या सोयाबीनची शेती, किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *