Dhananjay Munde

Dhananjay Munde । आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा! मिळणार संसार उपयोगी साहित्य किट

बातम्या

Dhananjay Munde । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. या संकटांमुळे शेतकरी हवालदील होतात. त्यामुळे अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर त्या कुटुंबासमोरचे प्रश्न आणखी वाढत जातात. हजारो शेतकरी कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या करतात. अशातच आता आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी एक मोठी बातमी आहे.

MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी

आता राज्यातील विविध जिल्ह्यांतील २ हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्याचे किटच वितरण करण्यात येणार आहे. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन २०२३ असे या सरकारच्या उपक्रमाचे नाव आहे.

Agriculture Exhibition । आता शेतकऱ्यांनाही बसता येईल हेलिकॉप्टरमध्ये! पुढच्या महिन्यात होणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

मिळणार या वस्तू

दरम्यान, याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार कृषिमंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. यात नॅनो युरिया, भाजीपाला बियाणे,सूक्ष्म मूलद्रव्य, वेगवेगळ्या कीटकनाशकांचा समावेश आहे. दिवाळी फराळसाठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित वस्तूंचा देखील यात समावेश केला आहे.

Agriculture Mechanization । मोठी बातमी! कृषी यांत्रिकीकरणाचे थकले २ कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *