Nursery Subsidy

Nursery Subsidy । शेतकऱ्यांनो, सोडू नका अशी संधी! ‘या’ सोप्या पद्धतीने आजच मिळवा नर्सरी अनुदान, जाणून घ्या अर्जपद्धती

शासकीय योजना

Nursery Subsidy । राज्यातील अनेक तरुण सध्या नोकरी सोडून व्यवसाय (Business) करू लागले आहेत. कारण अनेकांचा नोकरीच्या पैशावर उदरनिर्वाह होत नाही. परिणामी काही तरुण व्यवसायाकडे वळतात. समजा तुमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका, सरकार व्यवसाय (Government Schemes) सुरु करण्यासाठी पैसे देते. त्यामुळे तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता.

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

अनेक तरुण नर्सरी सुरु करत आहेत. नर्सरींमधून (Nursery) त्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे राज्य सरकारच्या महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत तरुणांना नर्सरी उद्योगासाठी (Nursery industries) अनुदान देण्यात येत आलेत. याचा लाभ अनेकजण घेत आहेत. परंतु, काहींना माहिती नसल्याने त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. (Nursery Industries Subsidy)

Success Story । पोलिसाचा नादच खुळा! नोकरीला लाथ मारली अन् चक्क सुरू केली पांढऱ्या चंदनाची शेती

सध्या अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सुरु केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत चिकू, मोसंबी, सिताफळ, पेरु, संत्री, आंबा, काजू, डाळिंब, लिंबू, पडवळ, मिरची (हिरवी/लाल) आणि फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकासाठी “रोपवाटीका उभारणीसाठी अर्ज मागवले आहेत. तसेच पेरु, डाळिंब, केळी, स्ट्रॉबेरी आणि फुलपिके या निवडक फलोत्पादन पिकासाठी “उती संवर्धन युनिट उभारणीसाठीदेखील अर्ज मागविले जात आहे.

Onion Rate । सध्या कांद्याला किती भाव मिळतोय? जाणून घ्या मार्केटमधील रेट

अशी होणार निवड

दरम्यान, पात्र अर्जाचे मुल्यांकन केले जाईल. त्यानुसार “रोपवाटीका उभारणीसाठीचे प्रथम 07 आणि “उती संवर्धन युनिट उभारणीसाठीचे प्रथम 02 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या लाभार्थीना प्रकल्पांतर्गत मॅचिंग ग्रँट म्हणून अनुदानाच्या स्वरूपात रोपवाटीका उभारणीसाठी पात्र प्रकल्प किंमतीच्या अधिकतम 60 टक्केपर्यंत किंवा कमाल 60 लाख रुपये प्रति प्रकल्प यापैकी जे कमी असेल त्यानुसार अर्थसहाय्य मिळेल.

Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले मात्र नेपाळमध्ये 200 तर श्रीलंकेत 300 रुपये किलोवर पोहचला कांदा

या ठिकाणी करा अर्ज

अर्जासाठी या जाहिरातीद्वारे आवश्यक असलेले लाभार्थी निवडीची प्रक्रिया, पात्र आणि अपात्र घटक, पात्रता निकष,अर्थसहाय्याचे स्वरुप, लाभार्थीनिहाय विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष, कागदपत्रांची तपासणी सूची, विविध प्रपत्र इ. बाबतची माहिती महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे www.magnetadb.com या संकेतस्थळावर व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या वेळी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

अंतिम मुदत

जर तुम्हाला सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अर्ज करता येईल. त्याशिवाय हे लक्षात घ्या की, या जाहिराती संदर्भात शुध्दीपत्रके फक्त महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, पुणे व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

Agricultural Laws । पाईपलाईनसाठी तुमच्या शेजारचा शेतकरी तुम्हाला अडवतोय का? या कायद्याने तुम्ही करू शकता कारवाई; जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *