Success story

Success story । पारंपरिक शेतीला फाटा देत सांगलीच्या शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन! मिळाला 38 हजाराचा दर

यशोगाथा

Success story । पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. कारण यात चांगला नफा मिळतो. विशेष म्हणजे तरुणवर्ग नोकरी न करता शेतीकडे वळू लागला आहे. हे तरुण शेतात नवनवीन पिके घेत आहेत. बाजारातही त्याला चांगला भाव मिळत आहे. तुम्ही लाल ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit) पाहिले असेल. पण कधी पिवळे ड्रॅगन फ्रुट पाहिले आहे का? एका तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात पिवळे ड्रॅगन (Yellow Dragon fruit) पिकवले आहे.

Udid Rate । उडदाला आज किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

सांगलीच्या शेतकऱ्याने केला अनोखा प्रयोग

सांगली जिल्ह्यात हा प्रयोग करण्यात आला. जत तालुक्यातील उटगी गावातील उमेश लिगाडे या शेतकऱ्याने पिवळे ड्रॅगन पिकवले आहे. ते एकूण २४८ किलो माल विकण्यासाठी रविवारी आडते रावसाहेब कुंजीर यांच्या गाळ्यावर आला. त्यांना ३८ हजार रूपये दर मिळाला आहे. लिगाडे यांनी त्यांच्या सव्वा एकर जमिनीत पिवळ्या ड्रॅगनची लागवड (Yellow Dragon fruit Cultivation) केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी २०१४ मध्ये लाल ड्रॅगनची लागवड केली होती.

Onion Rate । सोलापूर, बारामती बाजारसमिती कांद्याला आज सर्वाधिक किती दर मिळाला?

त्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये पिवळ्या ड्रॅगनची दोन हजार रोपांची लागवड केली. त्याचे उत्पादन आता सुरू झाले असून लाल ड्रॅगनच्या तुलनेत पिवळ्या ड्रॅगनची टिकवण क्षमता जास्त आहे. यात पांढरा गर असतो. शिवाय लाल ड्रॅगनफ्रुटच्या तुलनेत पिवळे ड्रॅगन खायला चविष्ट असते, त्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी असते. तसे पाहिले तर हे फळ अमेरिकेतील वाळवंटामध्ये घेतले जाते. परंतु आता भारतात त्याची शेती केली जाते.

बोअरवेल घेताना पाणी कुठे आहे कसे शोधायचं? जाणून घ्या

सरकार देणार अनुदान

आता राज्य सरकारकडून ड्रॅगन फ्रुट शेती करणाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख ६० हजारांचं अनुदान मिळणार आहे. जर तुम्हाला ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागेल.

Electricity | सर्वात मोठी बातमी! राज्यात होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *